Pune : पारगावातील पुरातन संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त गर्दी

आंबेगाव येथील त्रिवेणी संगमावरील संगमेश्वर मंदिर परिसरात ब्रम्हकुमारी विद्यालय मंचर शाखेच्या वतीने भाविकांना मानसिक शांती, तणावमुक्त जीवन, व्यसनमुक्त जीवन यावर प्रबोधन केले.
pune Mahashivratri Pargaon Ambegaon Sangameshwar Temple
pune Mahashivratri Pargaon Ambegaon Sangameshwar Temple sakal

पारगाव - आंबेगाव येथील त्रिवेणी संगमावर असलेल्या पुरातन संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त आज शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.भाविकांनी रांगेत उभे राहून देवाचे दर्शन घेतले.

पारगाव येथील घोडनदी व मीनानदी व दक्षिण गुप्त गंगेच्या त्रिवेणी संगमावर पुरातन संगमेश्वर मंदिर आहे हे मंदिर प्रति भीमाशंकर म्हणून समजले जाते तसेच निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

pune Mahashivratri Pargaon Ambegaon Sangameshwar Temple
Pune : सहकारी बँकांनी एकत्रित येण्याची गरज: विद्याधर अनास्कर

महाशिवरात्री निमित्ताने संगमेश्वर मंदिरात देवास पहाटे रुद्राभिषेक केल्यानंतर देवास हारतुरे तसेच महाआरती करण्यात आली. तालुक्याच्या पुर्वभागातील लोणी ,धामणी, काठापूर ,लाखणगाव ,जवळे ,भराडी, रांजणी, नागापूर आदी गावातीलभाविकांची दिवसभर देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

ब्रम्हकुमारी विद्यालय मंचर शाखेच्या महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात आध्यात्मिक चित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी शिवरात्रीचे महत्व सांगण्यात आले.तसेच ब्रम्हकुमारी विद्यालयाचे ईश्वरीय कार्य ८६ वर्षापासून सतत सुरु आहे.

pune Mahashivratri Pargaon Ambegaon Sangameshwar Temple
Shiv Jayanti 2023 : विश्वविक्रमी 21 फुटी कवड्यांची माळेचे डॉ. शितल मालुसरे यांच्या हस्ते अनावरण

१४० देशांमध्ये पाच हजाराहून अधिक शाखा कार्यरत असून या ज्ञानाव्दरे मानसिक शांती, तणावमुक्त जीवन, व्यसनमुक्त जीवन यावर प्रबोधन केले जाते असे यावेळी सांगितले. यावेळी संध्या बहनजी,सरस्वती बहनजी,

प्रविणा बहनजी, पुजा कोष्टी, स्नेह निघोट,मुकेशभाई पटेल, प्रसन्नभाई थोरात, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे उपस्थित होते. दिवसभर संगीत भजन मंडळाच्या संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असल्याचे शिवयोगी शैलेज महाराजांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com