Pune : छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मंचरच्या ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेला ; वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते

ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार डी.के वळसे पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.
Minister Mungantiwar
Minister Mungantiwarsakal

मंचर : आंबेगाव तालुक्यातील ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेला राज्य शासनाच्या वन विभागामार्फत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०१९ व पश्चिम विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला.

ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार डी.के वळसे पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. एक लाख रुपयांचा धनादेश, मानचिन्ह, प्रमाणपत्र शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे

यशदा संस्था पुणे येथे पुरस्कार वितरण समारंभ झाला. यावेळी प्रधान सचिव (वने) बी वेणुगोपाल रेड्डी, प्रधानमुख्य वन संरक्षक वाय.एल पी.राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) डॉ.सुनिता सिंघ, वन संरक्षक सामाजिक वनीकरण (पुणे) हनुमंत धुमाळ,विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण (विभाग पुणे) अमोल थोरात, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीप मेदगे, सुधीर काळे, कैलासराव सावंत, रंजना शेटे, उत्तम भेके, नूतन सुधीर काळे, महानंदा वळसे पाटील, मीनाक्षी संतोष वळसे पाटील, वास्तु विशारद यशल वळसे पाटील उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार यांनी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने वृक्ष लागवड व संवर्धनासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले.यापुढे वृक्ष लागवड व संवर्धन जनजागृतीसाठी ज्ञानशक्ती सारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत वनखते घेईल.”

याबाबत ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या मुख्य अधिकारी गार्गी विशाल काळे पाटील म्हणाल्या “वृक्ष लागवड व संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली १६ वर्ष ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था जनजागृतीचे अविरतपणे काम करत आहे. संस्थेने आदर्शगाव योजनेच्या अंतर्गत दुष्काळी असलेले भागडी (ता.आंबेगाव जि.पुणे) हे गाव पाणीदार होण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत. तेथे संस्थेने भागडी ग्रामस्थांच्या सहकार्याने व लोकसहभागातून वृक्ष लागवड व संवर्धन हा नाविन्य पूर्ण हटके प्रयोग राबवला आहे.

Minister Mungantiwar
Sakal Exclusive : दस्त नोंदणी कमी होवूनही बाराशे कोटी महसुल; अतिरिक्त उद्दिष्ट गाठण्यात यश

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी जनजागृती फेऱ्यांप्रमाणेच कार्यशाळा ही गावात आयोजित केल्या होत्या. लग्नाची नाव नोंदणी ग्रामपंचायतमध्ये करण्यापूर्वी दांपत्याने किमान दोन वृक्षांची (फळझाडे) लागवड करणे, अपत्य झाल्यानंतर बाळाची नाव नोंदणी करण्यापूर्वी एक फळझाड व वाहन खरेदी केल्यानंतर चाकाच्या संख्येप्रमाणे वृक्ष लागवड करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला होता. या ठरावाची काटेकोरपणे अंमलबजावणी गावकऱ्यांनी केली. त्यासाठी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने पुढाकार घेतला.

मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या आवारात पाच एकर क्षेत्रात ज्ञानशक्तीने केशर आंबा लागवड केली. दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान धोकादायक ठरत आहे. त्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखा, वृक्षांवर मुलामुलींप्रमाणे प्रेम करा. पक्षी,प्राणी यांच्या संवर्धनासाठी लक्ष द्या. याबाबत जनजागृतीचे प्रभावीपणे काम केले.

Minister Mungantiwar
Pune Politics: ‘त्या’ बॅनरबाजीवरील टीका जिव्हारी, पोस्टरवरून जगदीश मुळीक म्हणाले...

या उपक्रमाच्या अमलबजावणीसाठी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. या पुरस्कारासाठी राज्यातून अनेक सेवाभावी संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. १०० गुणांपैकी ८८ गुण ज्ञानशक्ती संस्थेला मिळाले आहेत या कामाची दखल घेऊन पुरस्कार देण्यात आला आहे.”

यशदा (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी.के वळसे पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com