पुणे : मंचर येथे शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी घोषणाबाजी
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSakal

मंचर : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने मंचर (ता.आंबेगाव) येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शक्ती प्रदर्शन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी घोषणाबाजी केली. आंबेगाव तालुका शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो. १९८४ मध्ये पुणे जिल्ह्यात पहिली शिवसेना शाखा मंचर येथे स्थापन करण्यात आली. या तालुक्याने पुणे जिल्यात १९९२ मध्ये पहिला जिल्हा परिषद सदस्य (स्व) नाना गाडे यांच्या रूपाने शिवसेनेने दिला आहे.

२००४ पासून सलग तीन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील येथून खासदार झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याच्या पार्श्वभूमीवर येथील शिवसैनिक काय भूमिका घेणार याविषयी नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. आज झालेल्या शक्ती प्रदर्शनात तालुक्यातील अनेक नेते गैरहजर असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर शिवसेनेचे नेते पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बाणखेले म्हणाले “आजचे शक्ती प्रदर्शन फक्त मंचर शहराचे होते. आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिक एकसंघ आहेत. लवकरच तालुका स्तरावरील कार्यकर्ते एकत्रित जमून ठाकरे कुटुंबियांना पाठींबा देणार आहेत.”

शिवसेनेचे जेष्ठ नेते सहसंपर्कप्रमुख अँड.अविनाश राहणे, पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बाणखेले, उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट (स्व) बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांची छायाचित्र असलेले फलक हातात घेऊन “उद्धव साहेब ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है” अश्या घोषणा देऊन शिवसैनिक मुख्यमंत्र्यांसोबतच आहेत. अशी ग्वाही दिली. भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे,संचालक योगेश बाणखेले,स्वप्नील बेंडे,अमोल बाणखेले, महेश घोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व (स्व) बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

यापूर्वी राज्यात शिवसेना व भाजप सत्तेवर होते. त्यावेळी ही भाजपकडून अन्याय झाला होता. सद्यस्थितीत काही अडचणी किंवा तक्रारी असतील तर त्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणे गरजेचे होते.पण गुजरात व आसाममध्ये जाऊन शिवसेना पक्षासमोर आवाहन निर्माण करणे योग्य नाही. अजूनही वेळ गेली नाही. बंडखोरांनी मुख्यमंत्र्यांना भेटावे. शिवसेनेशी कोणीही दगाबाजी करू नये. आत्तापर्यंत अनेक बिकट प्रसंगांना शिवसेनेने समर्थपणे तोंड दिले आहे.या संकटातून सावरून शिवसेना दमदारपणे वाटचाल करेल. कारण सामान्य शिवसैनिक ठाकरे कुटुंबाबरोबरच आहे. अशी ग्वाही राजाराम बाणखेले व अँड राहणे यांनी दिली. शिवसेनेचे जेष्ठ नेते बाळासाहेब शिंदे, महिला आघाडी प्रमुख मालती थोरात, रंगनाथ थोरात,अरुण बाणखेले, कमरअली मण्यार, अशोक थोरात, ज्ञानेश्वर लोखंडे, सुरेश चव्हाण, दत्ता माशेरे उपस्थित होते. शिव सैनिकांच्या भावना तीव्र होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com