#PuneMandai वारज्यात रस्त्यावरच भाजी मंडई

अमर सदाशिव शैला
सोमवार, 25 जून 2018

पुणे - महापालिकेच्या हद्दीत गाव समाविष्ट होऊन वीस वर्षे उलटूनही अद्याप केवळ कागदावरच मंडईचे आरक्षण आहे. प्रत्यक्षात मंडई नसल्यामुळे वारजे माळवाडीत रस्त्यावरच मंडई भरत आहे. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

एनडीए रस्त्यावरील मुख्य पीएमपी बसस्थानकाच्या अलीकडील रस्त्यावर जुनी भाजी मंडई आहे. महापालिका दिवसाला पन्नास रुपये शुल्क भाजी विक्रेत्यांना आकारत आहे. 

या विक्रेत्यांना ओळखपत्र दिले आहे. मंडईचे आरक्षण असूनही भूसंपादनाअभावी मंडईचे काम सुरू झालेले नाही. शौचालयांची व्यवस्था नसल्यामुळे महिला भाजी विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.

टीडीआर, एफएसआयद्वारे जमिनी ताब्यात घेऊन लवकरात लवकर भाजी मंडई उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.
- सचिन दोडके, नगरसेवक

महापालिकाने भाजी मंडई उभारताना सध्या मंडई आहे त्याच्या मागील जागेतच उभारावी. दुसऱ्या ठिकाणी मंडई उभारल्यास त्याचा परिणाम व्यवसायावर होण्याची शक्‍यता आहे. 
- मनीषा पाटणकर, भाजी विक्रेत्या

रस्त्यावरच मंडई असल्याने भाजी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी लावलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा होतो. या वाहनचालकांविरोधात कारवाई केली जात नाही. 
- राजश्री धांडे, गृहिणी

Web Title: pune mandai vegetable road