पुणे ते मंगळुरु, करमाळी रेल्वे गाड्या सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पुणे - प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-मंगळुरु आणि पुणे-करमाळी या दोन हॉलिडे स्पेशल गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आठवड्यातून एकदा या गाड्या सोडण्यात येणार आहेत.

पुणे - प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-मंगळुरु आणि पुणे-करमाळी या दोन हॉलिडे स्पेशल गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आठवड्यातून एकदा या गाड्या सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवाच्या दरम्यान रेल्वे प्रशासनाने पुणे-झरप ही हॉलिडे स्पेशल गाडी सुरू केली होती; परंतु ती दिवाळीपूर्वीच बंद केली. त्यानंतर पनवेलमार्गे कोकण, गोवा आणि कर्नाटकला जाणाऱ्या प्रवाशांना कोणतीही सोयीची गाडी नव्हती. त्यामुळे पुणे-मंगळुरु आणि पुणे-करमाळी ही गाडी सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपने केली होती. येत्या आठवड्यात या गाड्या सुरू करणार असल्याचे ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी सांगितले. या गाड्या 12 जानेवारीपर्यंतच सुरू ठेवणार आहेत. त्याऐवजी प्रवाशांच्या सोयीसाठी त्या कायमस्वरूपी सोडाव्यात, अशी मागणी शहा यांनी केली आहे.

Web Title: pune to mangaluru, karmali railway