पुणे : मांजरी रेल्वे उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गाचे काम मार्गी

दोन दिवसात हे काम पूर्ण होऊन मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला होणार
Pune Manjari railway bridge footpath Work complete in two days
Pune Manjari railway bridge footpath Work complete in two dayssakal

मांजरी : गेली तीन वर्षांपासून रेंगाळलेले येथील रेल्वे फाटकावरील पादचारी भुयारी मार्गाचे काम मार्गी लागले आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सात तासाचा ब्लॉक घेऊन गुरुवारी या मार्गाचे काम करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात हे काम पूर्ण होऊन मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला होणार आहे.

सकाळी सात वाजल्यापासून भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्य लोहमार्गाखालील मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, दुपारी जेसीबी यंत्राचे लोखंडी चाक नादुरूस्त झाल्याने पर्यायी व्यवस्था करण्यात एक तासाचा कालावधी गेला. त्यामुळे दोन्हीही बाजूकडील राहिलेले काम पूर्ण करण्यात अडथळा निर्माण झाला होता. ते पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.

यापूर्वी रेल्वेफाटक कायमस्वरूपी बंद करताना हे काम करण्यासाठी रेल्वेकडून सहा तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, कठीण दगड लागल्याने हे काम त्यावेळेत करणे अशक्य झाल्याने करता आले नव्हते. दररोज शेकडो प्रवासी व स्थानिक नागरिक त्यामुळे जीव धोक्यात घालून लोहमार्गावरून प्रवास करीत आहेत. काल तीन वर्षांनी पुन्हा रेल्वे प्रशासनाने सात तासांचा ब्लॉक देऊन हे काम करण्यात आले. या पादचारी भुयारी मार्गामुळे आता नागरिकांना निर्धोक प्रवास करता येणार आहे. दरम्यान, हा मार्ग केवळ पादचाऱ्यांसाठी असल्याने स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. किमान दुचाकी वाहनांना येथून प्रवासासाठी हा मार्ग खुला ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

"फाटक बंद करताना भुयारी मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर पुन्हा रेल्वे प्रशासनाकडून कालचा ब्लॉक मिळाल्यावर हे काम करण्यात आले आहे. हा पादचारी मार्ग छत्तीस मीटर लांबीचा आहे. मात्र, काल केवळ लोहमार्गाखालील काम झाले आहे. तीन-चार दिवसांत संपूर्ण काम होऊन मार्ग केवळ पादचाऱ्यांसाठी सुरू होईल. कोणत्याही प्रकारच्या वाहनाला येथून प्रवास करता येणार नाही.'

- राजेंद्र कुलकर्णी, अभियंता, रेल्वे बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com