मोदींसाठी 70 फुट उंच 'स्वच्छ भारत' आकाशकंदील

नीलेश कांकरिया
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

वाघेाली : वडगावशेरी येथील शिवराज विद्या मंदिराने 70 फुट उंचीचा स्वच्छ भारत जागृती आकाशकंदील तयार केला आहे. 70 वा स्वातंत्र्य दिवस व स्वच्छ भारत मिशन याचे औचित्य साधून हा कंदील तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मेादी यांना हा आकाश कंदील भेट देण्याचा विद्यालयाचा मानस आहे.

वाघेाली : वडगावशेरी येथील शिवराज विद्या मंदिराने 70 फुट उंचीचा स्वच्छ भारत जागृती आकाशकंदील तयार केला आहे. 70 वा स्वातंत्र्य दिवस व स्वच्छ भारत मिशन याचे औचित्य साधून हा कंदील तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मेादी यांना हा आकाश कंदील भेट देण्याचा विद्यालयाचा मानस आहे.

विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे धडे घरातून मिळतात. मात्र सार्वजनिक स्वच्छताबाबेत केाणी गांभीर्याने घेत नाही. या विषयाची जनजागृती व्हावी या उद्शाने हा आकाशकंदील तयार केल्याचे या उपक्रमाचे मार्गदर्शक विनायक काकडे यानी सांगितले. कापडापासून हा कंदील तयार करण्यात आला आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी स्वहस्ते स्वच्छतेचे संदेश लिहीले आहेत.

यामध्ये अनेक चित्रांचाही समावेश आहे. एक कदम स्वच्छताकी ओर, हम सबने यह ठाणा हे भारत स्वच्छ बनाना है, स्वच्छतेचा संकल्प सुंदर हेाईल परिसर, सार्वजनिक स्वच्छता पाळू व सर्व निरेागी राहू. अशा अनेक संदेशाचा यामध्ये समावेश आहे. या स्वच्छ भारत आकाशकंदील विषयी माहीती पंतप्रधान नरेंद्र मेादी यांना 'ई मेल'व्दारे पाठवून त्यांना तेा प्रदान करण्यासाठी त्यांच्या भेटीच्या वेळाची मागणी विद्यालयाने त्यांच्याकडे केली आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या सचिव गीता साळुंके, मुख्यध्यापीका अरुणा मेारे, मुख्यध्यापक सी.जी वाघमारे, विनायक काकडे, वंदना पठारे, शिवाजी पवार, गणेश निर्मळ, राजेंद्र साळवे, गजेंद्र केदार, मनीषा साळुंके, विजया भेासले, सुनंदा भेार, संगीता ओव्हळ आदीनी परीश्रम घेतले.

"सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जावे. यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. हा कंदील पंतप्रधान नरेंद्र मेादी यांना भेट देण्याचा मानस आहे. यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यानी परीश्रम घेतले. त्यांचे कैातुक करावे तेवढे थेाडे आहे."
- गीता साळुंके, सचिव, सिध्दीविनायक शिक्षण संस्था.

Web Title: pune marathi news 70 feet diwali lantern at vadgaon sheri school