उपचार करणाऱ्या डॉक्टरवर दम्याच्या रुग्णाचा चाकू हल्ला

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

खडकवासला : नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. संतोष आवारी यांच्यावर ७५ वर्षीय रुग्णाकडून चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. डॉक्टरच्या पोटावर आणि डाव्या हाताला जखम झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत. दम्याच्या उपचारासाठी हा रुग्ण दाखल झाला होता. 

दरम्यान, हा प्रकार दवाखान्यातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. डॉ. संतोष आवारी हे त्यांच्याकडे ४ दिवसांपूर्वी 75 वर्षीय दम्याचा रुग्ण दाखल झाला होता. या रुग्‍णाला औषधोपचाराने बरे वाटत होते, पण आणखी ३ दिवस दाखल करण्याची गरज होती. असे डॉक्‍टर आवारी यांनी सांगितले. सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता डॉक्‍टर आवारी सायंकाळी सिंहगड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना तपासत होते. त्याच्याजवळ गेले असता त्याने उशी खाली लपवलेला चाकू काढला. त्याने डॉक्टरच्या पोटाच्या दिशेने हल्ला केला. 

यावेळी डॉक्टरने स्वतः चा बचाव केला. रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांनी रुग्णास धरून ठेवले. डॉक्टर तेथून गेल्यावर त्या रुग्णाने त्याच्यासमवेत असलेल्या दोन नातेवाईकांना हाताने मारहाण केली. हा रुग्ण हॉस्पिटलजवळच राहणार असल्याचे समजते. याबाबत सकाळी जखमी डॉक्टर आणि अन्य डॉक्टरांनी भेट घेतली, परंतु त्यांनी तक्रार दिली नाही, अशी माहिती हवेलीचे पोलीस निरीक्षक विश्वभंर गोल्डे यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune marathi news khadakwasla doctor attacked by patient