उपग्रहाद्वारे वृक्षगणना म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी का?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

मनसेचा पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाला सवाल

जुनी सांगवी : रमेश मोरे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उपग्रहाद्वारे वृक्षगणना हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत उपग्रहाद्वारे वृक्षगणना करण्याचा प्रस्ताव वृक्षविभागाने मान्यतेसाठी आयुक्तांकडे सादर केला आहे.

या उपक्रमाचा पहिल्यांदाच प्रयोग करण्यात येणार अाहे. यासाठी सहा कोटी ऐंशी लाख रुपये ईतका अपेक्षित खर्च येणार आहे. हा विषय स्थायी समितीकडुन मान्यता मिळाल्या नंतर या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. परंतु याच्या आधीही मागील सत्ताधारी पक्षाने एका खाजगी कंपनीला दोन कोटी रूपये वृक्षगणना कामासाठी दिले होते. यात कच-यापासुन ऑईल निर्मिती आदी उपक्रम करण्यासाठी हा खर्च अपेक्षित होता. परंतु हे दोन कोटी रुपये कुठे व कसे खर्च झाले याची सर्वसामान्य नागरिक करदात्यांना माहिती नाही.

अद्यापपर्यंत या खर्चाची माहिती देण्यात आलेली नसल्याचे मनसेच्या वतीने पालिका प्रशासन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उपग्रहाद्वारे वृक्षगणना करण्याचे काम नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी असल्यास मनसेच्या वतीने तीव्र विरोधात करण्यात येईल असे मनसेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राजू सावळे, सचिन चिखले,रूपेश पाटेकर, हेमंत डांगे, राहुल जाधव, फैयाज जाधव, संतोष यादव, आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune marathi news satellite tree census opposed