Pune : इंग्रजीच्या हिंदोळ्यात मराठी शाळांची गुणवत्तेवर आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : इंग्रजीच्या हिंदोळ्यात मराठी शाळांची गुणवत्तेवर आघाडी

कॅन्टोन्मेंट : अलीकडे इंग्रजीच्या हिंदोळ्यामध्ये मराठी शाळांनी गुणवत्तेच्या जोरावर कायम स्थान टिकविले आहे. मराठी शाळेतील विद्यार्थी व्यवहार पाहात नाहीत, शिक्षणासाठी मदतीचा सतत हात पुढे करतात, ही मोठी जमेची बाजू आहे, असे मत मुख्याध्यापिका नीलिमा कांबळे यांनी व्यक्त केले.

कॅम्पमधील जॉन विल्सन सोसायटीच्या सेंट जॉन सेकंडरी स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी मधुकर कांबळे, अरुण रणधीर, शैलेश बिडकर, राकेश घुमटकर, चेतन पैलवान, जावेद खान, यासीन खान, किशोर चोरगे, सुनील सूर्यवंशी आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, मधुकर कांबळे म्हणाले की, प्रत्येक काम आणि प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे, त्यामध्ये कोणीही कमीजास्त लेखण्याचे कारण नाही. शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे, ब्लॅक-ग्रीन बोर्ड, 250 डिक्शनरी देत माजी विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक जपली आहे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्पाक शेख, अनिल गुडकरी, मारिया देठे, आरती केवटे, सीमा कांबळे या शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.