Pune : विकास दांगट यांच्याकडून राष्ट्रवादीची फसवणूक; गारटकर यांचा आरोप

बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे
कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेsakal

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणुकीत पॅनल तयार करताना अनेकवेळा विकास दांगट यांच्याशी चर्चा केली आहे. परंतु वेळकाढूपणा करत शेवटच्या टप्प्यापर्यंत गाफील ठेवत त्यांनी राष्ट्रवादीची फसवणूक केली. त्यांना भविष्यात खडकवासला मतदार संघातून भाजपची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा जनतेत आहे. त्यामुळेच ते भाजपसोबत छुपे गेले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी केला आहे.

बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, दिलीप बराटे, प्रकाश म्हस्के यांच्यासह उपस्थित होते. गारटकर म्हणाले,

“दांगट यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतली आहे. हवेली तालुक्यात बहुतांशी सोसायटी, ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. भाजप म्हणून खुला प्रचार केला तर ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे दांगट यांच्या माध्यमातून भाजप हवेली बाजार समितीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भविष्यात उमेदवारी देण्याचं गाजर दाखविण्यात आले आहे. अशी चर्चा सध्या जनेतेत आहे.”

भाजपाच्या बाजूने लढायचे होते तर खुलेआम लढणे गरजेचे होते. दांगट यांच्याकडून मिळणारी वागणूक कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारी होती. अण्णासाहेब मगर विकास आघाडी सर्वपक्षीय आहे असं नेतेमंडळी ओरडून सांगत होते, मात्र हा पॅनल सर्वपक्षीय नसुन भाजपप्रणित छुपा पॅनल असल्याचा आता हळुहळु मतदारांच्या समोर येत आहे. भाजपचा हा छुपा अजेंडा असून बाजार समितीच्या निवडणुकीनंतर विरोधी भूमिका घेणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचे गारटकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com