पुणे बाजार समितीकडून चोर सोडून शेतकऱ्याला फाशी

“रत्नागिरचा हापूस कर्नाटक आंबा” म्हणून जप्तचा प्रकार; समितीच्या कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला दमदाटी
 हापूस
हापूसsakal

पुणे : “रत्नागिरचा हापूस कर्नाटक आंबा” म्हणून जप्त करण्याचा प्रकार मंगळवारी गुलटेकडी मार्केट यार्डात घडला आहे. अजब म्हणजे हा आंबा कोणत्या जातीचा तपासण्यासाठी कोणताही अनुभव नसणाऱ्या एका परप्रांतीयाला बोलावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला. तर शेतकऱ्याने विनवणी करूनही बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना दमदाटी केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात सोमवारी शेतकरी महादेव लक्ष्मण काळे यांनी दापोली येथून हापूस आंब्याच्या शंभर पेट्या विक्रीसाठी आणल्या होत्या. परंतु हा आंबा कर्नाटक आंबा असल्याचे म्हणत बाजार समितीने शेतकऱ्यांच्या पेट्या ताब्यात घेतल्या. शेतकऱ्याने सातत्याने विनवणी करूनही त्यास प्रतिसाद न देता उलट शेतकऱ्यालाच दमदाटी करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीकडून चोर सोडून शेतकऱ्याला फाशी असा प्रकार घडला आहे.

शेतकरी महादेव लक्ष्मण काळे म्हणाले, बाजार समितीचे साहेब म्हणतात की हा आंबा रत्नागिरीचा नसून कर्नाटकचा आहे. बाजारात येताना शंभर पेट्या आणल्या होत्या. त्यातील रात्री दोन पेट्या चोरीला गेल्या आहेत. ९८ पेट्या शिल्लक आहेत. समितीचे लोक म्हणतात गाडी बाहेर लावायची. बाहेर गाडी लावली की बाहेरची लोक त्रास देतात. आत गाडी लावली की पार्कींगवाली लोक त्रास देतात. इथे चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहे. मार्केटमध्ये आले की सगळीकडून पैसे मागितले जातात. शेतकऱ्याची गाडी असताना दमदाटी करून पार्किंगचे पैसे घेतले जातात.

आंबा कोणत्या जातीचा तपासण्यासाठी कोणताही अनुभव नसणाऱ्या एका परप्रांतीयाला संबधित बाजार समितीच्या गटप्रमुख कामे बोलवण्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला. सुरुवातील त्याने कर्नाटक आंबा आहे म्हणून सांगितले. शेतकऱ्याच्या पेट्या उचलून सेक्युरीटी केबिनला आणल्यानंतर त्यानेच हा आंबा कोकणातील हापूस आंबा असल्याचे सांगितले. त्यामुळे समितीचे कर्मचारीही संभ्रमात पडले.

तो व्यापारी आहे. तिकडील नगराध्याशाकडून खरेदी केलेला हा माल आहे... तो नवीन असला तरी अडत्या जुना आहे. अडत्याने तो माल खालील गाळ्यावर उतरवणे आवश्यक होते. शेतकरी असो किंवा व्यापारी , बाजार समितीच्या अधिकारी कर्मचारी यांचे वागणे, बोलणे नम्रतेचे असावे या बाबत सूचना देतो.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

पाच वाजल्यापासून बाजार समितीचे कर्मचारी त्रास देत आहेत. शेतकऱ्यांनी माल विकायचा की यांचा त्रास सहन करायचा. दोन लाख रुपयांचा माल आहे. तो वेगळ्या वेगळ्या जागेवर उचलून ठेवला जातोय. त्यामुळे माल खराब होऊ शकतो. याला जबाबदार कोण आहे.

- महादेव काळे, शेतकरी, दापोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com