मार्केट यार्डात दिवाळीच्या खरेदीची लगबग; कोरोनामुळे आहारशैलीसुद्धा बदलली

pune1
pune1

पुणे: मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मनातील भीतीचे वातावरण कमी होत आहे. मार्केट यार्डात दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मार्केट पूर्वपदावर यायला सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळत आहे. दसरा आणि दिवाळीच्या सणाची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे.

सहा ते सात महिन्यानंतर बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी लोक दिसू लागले आहेत. लॉकडाऊनच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी लोकांच्या जीवनशैली बरोबरच त्यांची आहारशैलीसुद्धा मोठ्या प्रमाणात बदलली आहे. त्यामुळे ग्राहक दरापेक्षा वस्तूंचा दर्जा बघून खरेदी करत आहेत. खाण्यापिण्याच्या वस्तुंबरोबरच गृहोपयोगी वस्तूंना मागणी वाढत आहे. मागच्या वर्षी मर्यादित धान्यसाठा होता, त्या तुलनेत या वर्षी ग्राहकांमध्ये भाजके पोहे, नमकीन पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य, रवा, मैदा, पीठ यांचा याची मागणी अधिक वाढली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर असल्याचे दि पूना मर्चंटस चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सांगितले.

पुणेकरांनो फक्त 5 रुपयांत फिरा; पीएमपीची दसऱ्यापासून खास भेट

आरोग्याला पोषक तत्वे मिळावी याकरिता ग्राहक  काजू, बदाम, खजूर, मनुके, खारीक हा सुका मेवा तसेच मसाल्याला मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय येत्या काळात मंदिरे उघडतील, त्याचाही व्यापारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल, असे मत मार्केट यार्डातील व्यापारी नविन गोयल यांनी व्यक्त केले. 

घरपोच सेवा देण्याची कल्पना ठरली उपयुक्त 

अनेक लोकांनी सोसायटीच्या माध्यमातून, वेगळा व्यवसाय म्हणून घरपोच सेवा देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मधल्या काळात बेरोजगार असलेल्या अनेक हातांना रोजगार मिळाला. यामुळे प्रत्येक ग्राहकाला घरपोच माल मिळत असून रोजगारनिर्मिती होत आहे. 

'आम्हाला काय दोष देताय'; पुणे विद्यापीठाच्या खुलाशावर विद्यार्थी-...

हॉटेल आणि खानावळ सुरू झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये चमचमीत पदार्थ बनवून ग्राहकांची पुन्हा पसंती मिळवण्यासाठी हॉटेल आणि खानावळ उद्योजक प्रयत्नशील आहेत. परिणामी बाजारपेठांमध्ये हॉटेल, खानावळी करिता लागणाऱ्या वस्तूंची मागणी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया  दि पूना मर्चंटस चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली आहे.

मधला संपूर्ण कठीण काळाची पोकळी भरून काढण्यासाठी सगळेच उद्योजक जोमाने कामाला लागले आहे. त्यामुळे यंदा नव्याने लॉकडाऊन काळात तयार झालेले व्यावसायिक परदेशातील स्वदेशी स्थायिक नागरिकांना सण उत्सवाच्या निमित्ताने मिठाई आणि खाद्यपदार्थ पाठवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे अशा नवख्या व्यावसायिकांची गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे, असं रायकुमार नहार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com