मार्केट यार्ड : शहरासह, उपनगरात दर्जदार फळ व पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात बहुतांश फळभाज्यांच्या किलोच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर काही भाज्यांचे भाव 150 रुपयांपर्यत पोहचले आहेत. पालेभाज्याच्या गड्डीचे भाव 40 ते 30 रुपयांपर्यत पोहचले आहेत.
मागील दोन महिन्यात पडलेल्या उन्हाचा प्रचंड परिणाम फळभाज्यांवर झाला आहे. उन्हाच्या तडाखा आणि पाण्याची टंचाई यामुळे भाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच बाजारात येणाऱ्या भाज्यांची प्रतवारी देखील तितकी दर्जदार नाही. बाजारात चांगल्या भाज्यांना मागणी जास्त आहे. त्यामुळे भाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. तसेच भाज्यांचे भा आणखी वाढतील, अशी शक्यता किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी व्यक्त केली.
केटरिंग व्यावसायिक तसेच हाॅटेलचालकांकडून भाज्यांना चांगली मागणी आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. वाढलेल्या भावामुळे भाज्या खरेदी करताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होते आहे. पालेभाज्यां आणि फळभाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव तेजीत आहेत. जोपर्यंत बाजारात आवक वाढणार नाही, तोपर्यंत मात्र भाज्यांचे भाव तेजीत राहतील.
- अमोल घुले, व्यापारी मार्केट यार्ड
शेतकरी वर्गाकडून कच्च्या लिंबाची पाठवणी
बाजारात शेतकरी वर्गाकडून लिंबाच्या वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी लहान तसेच कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात व्रिक्रीस पाठविण्यास सुरवात झाली आहे. जी लिंबे बाजारात जून, जुलैमध्ये यायला हवी होती. लवकर तोडल्याने आताच बाजारात येत आहेत. त्यामुळे बाजारात येत असलेल्या लिबांमध्ये अपेक्षित रस नाही. तसेच ती कच्ची असल्याने त्याच्या खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली असल्याचे मार्केट यार्डातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले.
किरकोळ बाजारातील भाज्यांचे भाव
भाज्या दर
हिरवी मिरची 100-120
घेवडा 180-200
वाटाणा 180-200
वॉलवर 120-140
शेवगा 80-100
टोमॅटो 80-100
दोडका 80 -100
वांगी 70-80
फ्लाॕवर 80-100
पालेभाज्यांचे गड्डीचे भाव
कोथिंबीर 30-40
मुळा 30
मेथी 30
कांदापात 30
अंबाडी 30
चाकवत 30
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.