23-Year-Old Woman Dies in Dowry Harassment Case Linked to NCP LeaderEsakal
पुणे
Pune : हुंड्यासाठी छळ, सुनेनं गळफास घेतला; NCP अजित पवार गटाच्या नेत्याच्या पत्नीसह मुलगा आणि मुलीला अटक
Vaishnavi Hagwane : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिनं गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. या प्रकरणी वैष्णवीच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. वैष्णवी शशांक हगवणे असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव असून त्यांचं वय २३ वर्षे इतकं होतं. शुक्रवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात वैष्णवीच्या सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.