सिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या पोरखेळाला महापौर मुक्ता टिळक देखील वैतागल्या आहेत. जलसंपदाच्या 'त्या' अधिकाऱ्यांना उद्या (गुरुवार) सकाळी सिंचन भवन येथे जाऊन जाब विचारणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी  दिली. त्यामुळे पुण्याच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना तरी जलसंपदा खाते प्रतिसाद देणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 
 
जलसंपदा खात्याकडून यापूर्वी दोन वेळा महापालिकेला पूर्वकल्पना न देता पंप बंद करण्यात आले होते. आज दुपारी पुन्हा खडकवासला येथील पंपिंग स्टेशनमधील दोन बंद अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. त्यांची माहिती मिळताच महापौर टिळक यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि जलसंपदाचे सचिवांशी संपर्क साधला आणि हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता त्यांनी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार करण्यात येत असलेल्या खोडसाळपणाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली.

त्या म्हणाल्या," मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा जलसंपदाचे अधिकारी टाळाटाळ करीत असतील, तर त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. त्यांच्या या कृतीमुळे शहराचे वातावरण दूषित होत आहे. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची ही मनमानी आहे. त्यामुळे उद्या सकाळी दहा वाजता सिंचन भवन येथे आपण जाब विचारणार आहे.'' 
 
Web Title: Pune: Mayor will go to the irrigation house to talk water issue