मेट्रोचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पास केंद्रीय अर्थमंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी नगर विकास खात्याकडे सोमवारी पाठविल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.

सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (पीआयबी) आणि नगर विकास खात्याने मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तो अर्थखात्याकडे अंतिम मंजुरीसाठी गेल्यावर शिरोळे यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे.

त्यामुळे नगर विकास खात्यामार्फत मेट्रोचा प्रस्ताव आता केंद्रीय मंत्रिमंडळासमोरील कार्यपत्रिकेवर समाविष्ट होईल. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यावर प्रकल्पाचे भूमिपूजन शहरात होणे अपेक्षित आहे.

मंत्रिमंडळाकडून आता अल्पावधीतच मेट्रोला मंजुरी मिळणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली आहे. मेट्रो प्रकल्पाला मंजुरी कधी मिळणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

मात्र, मेट्रोमार्गाच्या नदीपात्रातील मार्गाबाबत पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला असून, त्याबाबत राष्ट्रीय हरित प्राधिकरणापुढे (एनजीटी) याचिका दाखल केली आहे. तिचा 7 डिसेंबर रोजी अंतिम निर्णय होणार आहे.

Web Title: Pune Metro gets approval from Finance Ministry