पुणे मेट्रोचे एक पाऊल पुढे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

अशी आहे प्रस्तावित पुणे मेट्रो

  • मेट्रो मार्गाची एकूण लांबी : 31 किलोमीटर
  • मार्गापैकी एकूण एलिव्हेटेड : 26 कि. मी.; भुयारी 5 कि. मी.
  • प्रकल्पाची एकूण किंमत : 12,298 कोटी
  • एकूण प्रस्तावित मेट्रो स्टेशन : 31

पुणे : केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या "पुणे मेट्रो'ने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मेट्रोच्या प्रस्तावास केंद्रीय नगर विकास खात्याने मंजुरी दिली आहे.

हा प्रस्ताव आता अर्थ मंत्रालयाकडे जाणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव अंतिम मंजुरी मिळणार आहे.

"पीआयबी'च्या मान्यतेनंतर पुणे मेट्रो चा प्रस्ताव केंद्रीय नगर विकास खात्याकडे मंजुरीसाठी गेला होता. त्यास नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान दिल्लीत शिरोळे यांनी आज (ता.18) केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेतली. त्या भेटी दरम्यान नायडू यांनी मेट्रोच्या प्रगतीबाबत माहिती दिली. हा प्रस्ताव लवकरच अर्थ मंत्रालयाकडे जाणार असून त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर तो सादर होईल. त्यात प्रस्तावाला मंजुरी मिळून मेट्रोचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होईल, असेही शिरोळे यांनी सांगितले.

अशी आहे प्रस्तावित पुणे मेट्रो

  • मेट्रो मार्गाची एकूण लांबी : 31 किलोमीटर
  • मार्गापैकी एकूण एलिव्हेटेड : 26 कि. मी.; भुयारी 5 कि. मी.
  • प्रकल्पाची एकूण किंमत : 12,298 कोटी
  • एकूण प्रस्तावित मेट्रो स्टेशन : 31
Web Title: Pune Metro gets approval from Urban Development ministry