पुणे मेट्रोला केंद्र सरकारची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

पुणे : गेली अनेक वर्षे चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेली पुणे मेट्रो अखेर रुळावर आली आहे. पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (बुधवार) अंतिम मंजुरी दिली.

पुणे मेट्रोचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे चर्चेच्या पातळीवरच होता. नागपूर मेट्रोला मंजुरी मिळून त्याचे कामही सुरू झाले होते. 'मेट्रो जमिनीवरून की खालून' या वादासह पर्यावरणप्रेमींनीही मेट्रोच्या मार्गाला आक्षेप घेतल्याने हा प्रकल्प सुरू होण्याआधीच रेंगाळला.

या मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव औपचारिक मंजुरीसाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सादर झाला होता. केंद्रीय नगरविकास आणि अर्थ खात्यानेही काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाल्याने आता पुढील तीन महिन्यांत पुणे मेट्रोच्या कामाला गती येईल. केंद्र सारकारने यासंदर्भात अधिसूचना काढल्यानंतर या कामात कोणताही कायदेशीर अडथळा निर्माण होणार नाही.

या महिन्याच्या अखेरीपासून रस्त्याखालील मध्यभागी असलेल्या विविध वाहिन्या कडेला हलविण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ होईल, असे नागपूर मेट्रोच्चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी काल सांगितले होते. 'या प्रकल्पात भूसंपादन हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रामुख्याने रस्त्याखाली मध्यभागी असलेल्या जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, वीज-टेलिफोन-इंटरनेट वाहिन्या हलवाव्या लागतील. त्यासाठी सर्वेक्षण करावे लागणर आहे. या कामाची निविदा महिनाअखेरीपर्यंत काढता येईल. तीन महिन्यांच्या आत प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे दीक्षित यांनी सांगितले होते.

पुणे मेट्रोला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर खासदार अनिल शिरोळे म्हणाले, "पुढील अनेक दशके पुणेकरांना उपयोगी पडणारी मेट्रो उपलब्ध करून देण्याच्या आश्‍वासनावर आज केंद्र सरकारची मोहोर उमटली आहे, याचे समाधान आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वेंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानतो.''

Web Title: Pune Metro gets final clearance from Modi Cabinet