पुण्यातील मेट्रो उपक्रम पर्यावरण पुरक होणार - ब्रिजेश दिक्षीत

Pune metro project have no side effect of environment
Pune metro project have no side effect of environment

पुणे(औंध) : पुण्यातील महामेट्रो या प्रकल्पामुळे बाधीत होणारे नागरीक, ज्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे असे सर्व पुणेकर व इतर कुणालाही मेट्रोच्या कामामुळे किंवा इतर कुठल्याही कारणाने गैरसोय होणार नाही. तसेच मेट्रोच्या कामामुळे पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास होणार नाही उलट पुण्यातील मेट्रो उपक्रम पर्यावरण पुरकच असेल अशी ग्वाही महामेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व महामेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनानिमित्ताने एक हजार वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. 

मेट्रोच्या निर्मितीसह पर्यावरणावर भर देत संपुर्णपणे सौरउर्जेचा वापर करण्यासंदर्भात मेट्रो प्रशासन सकारात्मक भूमिका घेत असून, सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याची योजना अंमलात येणार असल्याचे दिक्षीत म्हणाले. हरित उपक्रमाअंतर्गत डेपोंवर आणि  स्थानकांवर सौर तक्त्यांच्या उपयोगामुळे 17 मेगा वॅट विजेचा पुरवठा होईल. त्यायोगे विजेच्या आवश्यकतेच्या 65टक्के वीज उपलब्ध होईल. तसेच स्थानकांवरील पर्जन्य जलसंचय यंत्रणेमुळे 27,500 घन मीटर पाण्याचे पुनर्भरण होईल. नागपूर येथे आम्ही पाण्यावरील पुनःप्रक्रियेसाठी आणि पुनर्वापरासाठी बायोडायजेस्टर्सचा वापर केलेला आहे. सार्वजनिक स्वच्छता गृहात वापरण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सांडपाणी प्रक्रियेसाठी आर्द्र जमीन प्रक्रियेची चाचपणी सुरू आहे. पर्जन्य जलसंचय यंत्रणेसाठीच्या आमच्या प्रयत्नामुळे प्रतिवर्षी 27,500 क्यू. मी. पाण्याचे पुनर्भरण होईल. असेही दिक्षीत यांनी सागितले. यावेळी वृक्षारोपण करण्यासाठी आमदार विजय काळे, महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये, औंध आयटीआयचे प्राचार्य प्रकाश सायगावकर, सहसंचालक राजेंद्र घुमे, उपप्राचार्य यु.के.सुर्यवंशी, तसेच कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com