...अन्यथा पीएमपीच्या निम्म्‍या बस बंद करू

बस पुरविणाऱ्या ठेकेदारांना थकीत बिलाचे पैसे न मिळाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निम्म्या पीएमपी बस २५ मार्चपासून बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला
PMPML Bus News
PMPML Bus NewsSakal

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) बस पुरविणाऱ्या ठेकेदारांना थकीत बिलाचे पैसे न मिळाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निम्म्या पीएमपी बस २५ मार्चपासून बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे. पीएमपीने सद्यःस्थितीत सर्व ठेकेदारांची गेल्या सहा महिन्यांतील बिले दिली नाहीत. २५ मार्चपर्यंत बिलाची रक्कम न मिळाल्यास सेवा देणे शक्य होणार नाही, बसची देखभाल-दुरुस्ती आणि चालकांच्या वेतनाचा आर्थिक भार ठेकेदारांनाच उचलावा लागत आहे. (PMPML Bus News)

अशा परिस्थितीत हा खर्च पेलणे शक्य नाही. असे ठेकेदारांनी पीएमपीला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच सुमारे ६० कोटी रुपये थकल्याचा दावाही ठेकेदारांनी केला आहे. ‘पीएमपी’ला सहा कंपन्यांकडून बससेवा पुरविली जात असून, त्यांच्या सुमारे एक हजार बस ताफ्यात आहेत. त्यामध्ये सीएनजी आणि ई-बसचाही समावेश आहे. या बस कंत्राटी पद्धतीने ताफ्यात दाखल करून त्यांचे प्रतिकिलोमीटर उत्पन्न निश्चित केले जाते. याबाबत संबंधित ठेकेदारांकडून प्रशासनाशी चर्चा देखील केली होती. मात्र, त्यानंतरही थकीत पैसे देण्यात आलेले नाही. त्यामुळे अखेर संबंधित ठेकेदारांनी पीएमपी बसेस बंद करण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाला दिला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज सुमारे १५०० पीएमपीच्या बसेस धावतात. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. पीएमपीला दिवसाकाठी सुमारे ७० लाखांचे उत्पन्न मिळते. निम्‍या बंद झाल्या तर पीएमपीला चांगलेच आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

ठेकेदारांना रोजचे इंधनासाठीचे आणि इतर खर्चाचे पैसे दिले जातात. थकलेल्या रकमेचा फार मोठा फरक नाही. थकबाकीही दिली जाणार आहे. बस बंद करण्याचे इशारापत्र ठेकेदारांकडून पीएमपीला मिळाले आहे.

- डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालिका, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com