

BJP Pushes Aggressively for Pune Legislative Council Seat Amid NCP Tensions
esakal
पुणे, ता. २३ : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया जवळ येत असताना, पुण्याच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे. जिल्ह्यात भाजप आणि आघाडी मिळून ३३३ मतांची ताकद आहे. त्यामुळे जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी धरला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.