esakal | पुणे: लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त!
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त!

पुणे: लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरण्यात येणार असल्यामुळे, त्यातील त्रुटीचा फटका जुन्या पुण्याला बसणार आहे. २००१ च्या तुलनेत जुन्या पुण्यातील लोकसंख्येत मोठी घट झाली असल्याचे २०११ च्या जनगणनेत दिसून आले आहे. त्यामुळे या पेठांच्या संभाव्य वॉर्डमध्ये लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त असे चित्र निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

पुण्यासह राज्यातील महापालिका आणि नगरपालिका यांच्या आगामी निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आदेश काढले आहेत. त्यासाठी नजीकची जनगणना ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना कोरोनामुळे यंदा होऊ शकलेली नाही. त्यामुळे वॉर्ड एकचा की दोनचा होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला असला, तरी वॉर्ड रचनेसाठी महापालिकेला २०११ च्या जनगणनेचा आधार घ्यावा लागणार आहे. हे स्पष्ट आहे.

महापालिकेच्या एक सदस्यीय पद्धतीने २००७ मध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यासाठी २००१ ची जनगणना ग्राह्य धरून वॉर्डरचना करण्यात आली होती. त्यावेळी १४४ वॉर्ड झाले होते. त्यानंतर २०११ मध्ये केंद्र सरकारकडून नव्याने जनगणना करण्यात आली. २००१ आणि २०११ च्या जनगणनेचा तुलनात्मक अभ्यास ‘सकाळ’ने केल्यानंतर ही आश्‍चर्यकारक माहिती समोर आली आहे. दहा वर्षांत लोकसंख्येत वाढ होते.

हेही वाचा: पुणे: गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना ५० हजारांची लाच घेताना अटक

परंतु या अभ्यासात जुन्या पुण्यात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याचे दिसून आले. वास्तविक जुन्या पुण्याच्या हद्दीत या दरम्यानच्या कालवधीत वाडे जाऊन अनेक नवीन बांधकामे झाली. तरी देखील लोकसंख्या घटल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत वॉर्ड आणि २०११ च्या जनगणनेत त्याच वॉर्डातील लोकसंख्येचा आढावा घेतल्यानंतर पेठांमधील लोकसंख्या जास्तीत जास्त चार तर कमीत कमी एक हजाराने कमी झाली असल्याचे समोर आले. १४४ वॉर्डांपैकी सुमारे ३८ वॉर्डांमध्ये लोकसंख्या घटलेल्याचे दिसून आले आहे. तर १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमधील भागातील वॉर्डांमध्ये लोकसंख्या वाढली आहे.

२००७ मध्ये या गावामधील वॉर्डातील लोकसंख्या ही २०११ च्या जनगणनेत दुप्पट ते अडीच पट वाढल्याचे समोर आले आहे. काही वॉर्डांमध्ये लोकसंख्येत अल्पशी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत जुन्या पुण्याच्या हद्दीत होणाऱ्या वॉर्डमध्ये लोकसंख्या कमी आणि मतदारांची संख्या जास्त असे चित्र दिसणार आहे. जनगणनेतील त्रुटींचा हा परिणाम असू शकतो, असे मत काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसंख्या एक ते चार हजाराने कमी

उदा. : महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत महात्मा फुले मंडई या ७० क्रमांकाच्या वॉर्डातील लोकसंख्या १४ हजार ८८६ होती. ती २०११ च्या जनगणनेत १० हजार ७५२ पर्यंत कमी झाली. तर त्यालगत असलेल्या सिटी पोस्ट या ७१ नंबरच्या वॉर्डाची लोकसंख्या १७ हजार ६७२ वरून १२ हजार ७४१ वर आली आहे. विश्रामबागवाडा (६९), डेक्कन जिमखाना, राजेंद्रनगर (६८), हरकानगर (७५), डॉ कोटणीस दवाखाना (७९), एकबोटे कॉलनी (८७) डहाणूकर कॉलनी (१०८), बिबवेवाडी विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट (१३८) मॉडेल कॉलनी (३४), मॉडर्न कॉलेज (३५), कोरडगाव पार्क (४०), आयडीएल कॉलनी (६५) या वॉर्डातील लोकसंख्या जवळपास दोन ते अडीच हजाराने कमी झाली आहे.

या वॉर्डांत दुपटीने वाढ

विद्यानगर, लोहगाव (२)

टिंगरेनगर (३)

लोहगाव विमानतळ (७)

खराडी गाव (८)

साधना विद्यालय (९३)

वारजे जलशुद्धीकरण केंद्र (१०९)

पॉप्युलरनगर, वारजे (११०)

कोंढवा खुर्द (१२०)

एनआयबीएम (१२१)

विठ्ठलवाडी (१२८)

सुखासगरनगर (११३)

उपनगरांमधील लोकसंख्येत अशी झाली वाढ

loading image
go to top