पुणे-मुंबई अंतर सहा किलोमीटरने कमी होणार ; प्रवाशांचे 25 मिनिट वाचणार

Pune Mumbai distance reduced by 6 kilometers Khopoli Exit Kusgaon tunnel made
Pune Mumbai distance reduced by 6 kilometers Khopoli Exit Kusgaon tunnel made

पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागात उभारण्यात येत असलेल्या पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह आठ पदरी नविन रस्ता बांधण्याच्या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत दिड किलोमीटर लांबीचे बोगदे खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे- मुंबई हे अंतर सहा किलो मीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासात 25 मिनिटांची बचत होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरीडॉर सुधारणा तथा देखभाल , दुरुस्तीसाठी "बांधा, वापरा व हस्तांतरीत करा' (बिओटी) या तत्वावर 30 वर्षाच्या सवलतीच्या कालावधीसाठी शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरीत केले आहे. महामार्गामुळे पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहर जवळ आली आहे. दोन्ही शहरातील अंतर हे तीन ते साडेतीन तासवर आले आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतुक कोंडी फोडण्याबरोबरच दोन्ही शहरातील अंतर कमी करण्यासाठी हा प्रकल्प महामंडळाने हाती घेतला आहे. या कामाचा आढवा घेण्यासाठी काल मुंबई येथे एसआरएआरडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. 

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र येऊन मिळतात. तर पुढे खंडाळा एक्‍झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्‍झिट हा रस्ता सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. तसेच या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यत बंद ठेवावी लागते. या पार्श्‍वभूमीवर मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरच्या राहिलेल्या मिसींग लिंकचे एमएसआरडीने हाती घेतले आहे. 

 कोरोना काळातही पुणे विद्यापीठात अ‍ॅडमिशनसाठी डिमांड; 'एवढे' विद्यार्थी इच्छुक 

हे काम सुरू झाल्यानंतर राज्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्या कालवधीत मजूर निघून गेल्याने काम अत्यंत धिम्यागतीने सुरू होते. या कामाने आता वेग घेतला आहे. नऊ किलोमीटर पैकी दिड किलोमीटर बोगदा खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. तीन वर्षात हे काम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदार कंपनीला देण्यात आली आहे, अशी माहिती एमएसआरडीचे उपविभागीय अभियंता संजय पाटील यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

पाटील म्हणाले, " द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि महामार्गाला काही ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी महामंडळाकडून "मिसिंग लिंक ' हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बोर घाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.'' 

बाप रे! पुणे जिल्ह्यात ऑगस्टअखेर होणार कोरोना रुग्णांची 'एवढी' संख्या

मिसिंग लिंक या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक केबल ब्रिज , खालापूर टोल ते खोपोली एक्‍झिटपर्यंत आठ पदरी रस्ता आणि दोन बोगदे आहेत. या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या केबल ब्रिजची लांबी 645 मी आणि उंची 135 मी. असणार आहे. या पुलाच्या पुढे दोन बोगदे असणार आहे. पहिला बोगदा 1.6 किमी लांबीचा आणि दुसरा पूल 8.12 किमी लांबीचा आहे. या आशिया खंडातील सगळण्यात मोठा दरीवरील पूल या मार्गावर असणार आहे. 

अंतर वाचणार 
द्रुतगती मार्गावर कुसगाव ते खोपोली एक्‍झिट या भागातील 13.3 कि.मी लांबीच्या तसेच खोपोली इंटरचेंज ते खालापूर या अस्तित्वातील 5.86 कि.मी. लांबीच्या रस्ताचे 8 पदरीकरण करण्यात येणार आहे. दोन बोगदे व दोन दरीवरील पूल अशा एकूण 19.80 कि.मी लांबीचा 8 पदरी रस्ता बांधल्याने खोपोली एक्‍झिट ते कुसगाव हे 19 किमी ते अंतर 6 किमी ने कमी होऊन 13.3 किमी इतके होणार आहे. त्यामुळे वेळेची, इंधनाची बचत होणार आहे.

भाचीलाच वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या मावशीला अटक; कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तारांबळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com