सरळ रस्ताने जा सुसाट, घाटात जरा दमानं

सुधीर साबळे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांसाठी आखून दिलेल्या वेगमर्यादेत लवकरच बदल करण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार घाट परिसरात वेगाची मर्यादा प्रतिताशी ४० ते ५० ठेवण्यात येणार असून, सरळ रस्त्यावर ती १०० ठेवण्यात येणार आहे. नवा बदल पुढील महिन्यापासून लागू होणार असल्याचे समजते. रस्ते विकास महामंडळाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला असून, तो अंतिम मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला आहे. 

द्रुतगती मार्गावर होणारे अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचा आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अनेकदा वेगावर नियंत्रण न राहिल्याने येथे अपघात झाले आहेत. नव्या वेगमर्यादेमुळे वाहनचालकांवर निर्बंध येणार असून, वाहनांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. 

आराखडा तयार 
इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रकल्पाचा विकास आराखडा तयार आहे. येत्या काही दिवसांत तो मान्यतेसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. तिथून मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

त्यात हे असेल... 
द्रुतगती मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम सुरू करण्याअगोदर या परिसराचा खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात याठिकाणी कोणत्या त्रुटी आहेत, याचा अभ्यास करण्यात आला. नव्याने तयार केलेल्या आयटीएमएसच्या आराखड्यामध्ये वाहतुकीच्या सुरक्षिततेवर सर्वाधिक भर दिला आहे.

द्रुतगती मार्गावरील अपघात थांबावेत आणि वाहतुकीला शिस्त लागावी, म्हणून रस्ते विकास महामंडळाने आयटीएमएसचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित होणार आहे. 
- नम्रता रेड्डी, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

आराखड्यातील हे महत्त्वाचे
 द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूस प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियोजन
 सर्व्हिस लेनमध्ये थांबणारे वाहने व वेगमर्यादा ओलांडून लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर नजर 
 वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी लोणावळा परिसरात दोन सेंटर
 नियम तोडणाऱ्या वाहनांना टोलनाक्‍यावर दंड व तो भरण्यासाठी फुडमॉलच्या परिसरात किऑसचे नियोजन
 द्रुतगती मार्गावर कोणतीही घटना घडल्यास त्याची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला समजणार, घटनास्थळी तत्काळ कुमक पाठवणे शक्‍य 
 मार्गावर प्रवेश केल्यानंतर रस्त्याची स्थिती, कोणत्या भागात कोंडी झाली का, याची माहिती ठराविक अंतरावर वाहनचालकांना दिशादर्शक फलकाच्या माध्यमातून समजणार

Web Title: Pune Mumbai Express Way Speed Limit