#Expressway ‘एक्‍स्प्रेस’ अडथळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

तुटलेले लोखंडी संरक्षक कठडे, मधोमध पडलेले खड्डे, दुभाजकाजवळ तुटलेले बायफ्रेन रोप, यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्‍स्प्रेस वे) अपघातांचा धोका वाढला आहे.

पुणे - तुटलेले लोखंडी संरक्षक कठडे, मधोमध पडलेले खड्डे, दुभाजकाजवळ तुटलेले बायफ्रेन रोप, यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्‍स्प्रेस वे) अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. भरमसाट टोल घेऊनही दुरुस्तीकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर तीन भागांची मालिका आजपासून...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 

Image may contain: text

दुरुस्तीवर खर्चच नाही
द्रुतगती मार्गासाठी झालेल्या करारानुसार दुरुस्तीसाठी २०१५ मध्ये २६ कोटी, २०१६ मध्ये ३३ कोटी, २०१७ मध्ये ३६ कोटी, २०१८ मध्ये ३७ कोटी आणि २०१९ मध्ये २९ कोटी रुपये संबंधित कंत्राटदाराकडून मिळणे अपेक्षित आहे. ही रक्कम दुरुस्तीव र खर्च झाली असती तर मार्गाची दुर्दशा झाली नसती, असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांचे म्हणणे आहे.

 

Image may contain: text

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Mumbai expressway