मुंबई द्रुतगती महामार्गावर बस अपघातात 25 जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

पुणे- राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसचे पुढचे चाक पंक्चर झाल्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बस चारीत कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये किमान 25 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. 

बोरोवली - सातारा या बसला किवळे एक्झिट येथे हा अपघात झाला. बसचे पुढचे चाक पंक्चर झाल्यामुळे चालकाचा गाड़ीवारील ताबा सुटला आणि बस कठडा तोडून 20 फूट खोल चारीमध्ये कोसळली.

अपघातानंतर घटनास्थळी महामार्ग पोलिस दाखल झाले. द्रुतगती महामार्गावर अपघातावेळी तातडीच्या मदतीसाठी खास तैनात असलेली 'आर्यन देवदूत' वाहनेही घटनास्थळी पोचली. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास देहू रोड पोलीस करीत आहे.
 
Web Title: Pune-Mumbai Expressway accident