द्रुतगतीवर दुसऱ्या दिवशीही कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

सोमाटणे - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २९) वाहतुकीची कोंडी झाली. 

सुट्यामुळे आणि वीकएंडमुळे वाहनांची संख्या वाढल्याने ही कोंडी होत आहे. उर्से, खालापूर टोलनाक्‍यावर वाहनांच्या दुपारपर्यंत रांगा लागल्या होत्या.

शनिवार ते मंगळवार जोडून सलग चार दिवस सुट्या आल्या आहेत. मुंबईकरांनी पुण्याकडे येण्यासाठी तर पुण्याहून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या द्रुतगतीवर वाढली आहे.वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिस शर्तीची प्रयत्न करत होते. वाहन रस्त्यात अडकल्याने नियोजित ठिकाणी वाहनचालक एक तास उशिराने पोचत होते. महिला, ज्येष्ठ, शालेय विद्यार्थी, व्यापारी, कामगार यांचे अतोनात हाल झाले. दोन तासांच्या प्रवासासाठी चालकांना दीड तासाचा वेळ वाया घालावावा लागला. वाहतुकीच्या गैरसोयीमुळे शेतकऱ्यांचा माल मार्केटपर्यंत पोचण्यास उशीर झाला. पोलिस सूत्रांच्या मतानुसार द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने पुढील दोन दिवस वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Pune-mumbai highway traffic jam