प्रवाशांनो! आणखी दोन दिवस मुंबई-पुणे रेल्वे प्रवास टाळाच कारण...

सकाळव वह
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पुणे : सततचा पाऊस आणि घाट भागात रेल्वे रुळ खराब झाल्याने डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी आणि सिंहगड एक्स्प्रेससह अनेक गाड्या येत्या रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 

पुणे : सततचा पाऊस आणि घाट भागात रेल्वे रुळ खराब झाल्याने डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी आणि सिंहगड एक्स्प्रेससह अनेक गाड्या येत्या रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 

पावसाने बुधवारी काही प्रमाणात उघडीप दिल्याने रेल्वेसेवा सुरळीत होण्याची अपेक्षा होती. मात्र, कर्जत ते लोणावळादरम्यान दरड कोसळून बंद पडलेला मार्ग सुरळीत करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलेले नाही. रूळ दुरुस्तीचे काम गुरुवारीही करण्यात येणार असल्याने पुणे-मुंबईदरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून रेल्वेसेवा विस्कळित असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कामामुळेच रेल्वेसेवा बंद ठेवण्याची वेळ आल्याचे प्रवासी रमेश गायकवाड यांनी सांगितले. 

 
या गाड्याही रद्द 
दरम्यान, रेल्वेकडून पुणे-अहमदाबाद-पुणे, पुणे-एर्नाकुलम, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री, सोलापूर-मुंबई सिद्धेश्‍वर या गाड्याह कोल्हापूर, सांगली भागातील बहुतांश गाड्या रद्द केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Mumbai rail traffic disrupted till Sunday