Pune News : शहर स्वच्छतेला लागा आयुक्तांचे फर्मान

स्वच्छ भारत अभियानामध्ये पुण्याचा देशात पाचवा क्रमांक आल्यानंतर आता पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये आणखी झेप घेण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे
vikram kumar
vikram kumarsakal

पुणे : स्वच्छ भारत अभियानामध्ये पुण्याचा देशात पाचवा क्रमांक आल्यानंतर आता पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये आणखी झेप घेण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी परिपत्रक काढून सर्वच विभागांनी आपापल्या विभागांतर्गत स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत, रस्ते, उद्याने, पादचारी मार्ग, कचरा व्यवस्थापन, राडारोडा, सुशोभीकरणाची कामे ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करा असे फर्मान दिले आहे.

vikram kumar
महाराष्ट्रात 'दारू' का स्वस्त झाली ते आता समजलं : निलेश राणे

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान आयोजित केले जाते, गेल्या चार वर्षात पुणे महापालिकेची कामगिरी कधी सुधारली आहे. तर कधी नामांकन घसरले आहे. २०१६ मध्ये देशात ११ वा क्रमांक होता, २०१७ मध्ये १३, २०१८ मध्ये १०, २०१९ मध्ये ३७ आणि २०२० मध्ये पुन्हा १५ वा क्रमांक आला होता. शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी विविध उपाययोजना व प्रकल्प केले जात आहेत, पण शहर स्वच्छतेसाठी इतर विभागांचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे. २०२१ च्या स्वच्छ भारत अभियानात प्रशासनाने नागरिकांचा देखील सहभाग वाढवला, त्यामुळे सर्वात मोठ्या शहराच्या गटात थ्री स्टार मानांकन देखील मिळाले आहे. तर १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गटात देशात पाचवा क्रमांक आलेला आहे. या स्वच्छ भारत अभियानात महापालिकेला ६ हजार गुणांपैकी ४ हजार ९०० गुण मिळाले आहेत. त्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची संधी असून, २०२२ मध्ये होणाऱ्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि सेव्हन स्टार मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्या संदर्भात आयुक्त कुमार यांनी प्रत्येक विभागाने काय काम करायचे आहे याची यादी विभाग प्रमुखांना दिली आहे. ही कामे ३१ डिसेंबर पूर्वी पूर्ण करावेत असे आदेश दिले आहेत.

vikram kumar
'दोन वर्षाच्या काळात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेला' - प्रवीण दरेकर

या विभागांना दिले आदेश

सर्व क्षेत्रीय कार्यालय, बांधकाम विभाग, पथ विभाग, विद्युत विभाग, वाहतूक नियोजन विभाग, पाणी पुरवठा, शिक्षण मंडळ, आकाश चिन्ह विभाग, समाजा विकास, सामान्य प्रशासन, सांख्यिकी विभाग, अतिक्रमण, आरोग्य, जनसंपर्क, मंडई, मलनिःसारण देखभाल दुरुस्ती, मोटार वाहन, आपत्ती व्यवस्थापन विभाग या प्रत्येक विभागास त्यांनी काय काम करायचे आहे याची यादी आयुक्तांनी दिली आहे. यामध्ये क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी जास्त असून, त्यांना प्रत्येकी १७ कामे दिलेली आहेत.

३१ डिसेंबर पर्यंत करावयाची काही प्रमुख कामे

  • प्रत्येक प्रभागात कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण करावे

  • प्रभागातील रस्ते, भुयारी मार्ग, पादचारी मार्ग, उड्डाणपूल स्वच्छ करावेत

  • स्वच्छता गृहांची अंतर्गत व बाह्य स्वच्छता करणे

  • नदी पात्र, नाल्यात कचरा दिसू नये- बांधकामाच्या ठिकाणच्या राडरोड्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी

  • बांधकामाच्या ठिकाणच्या कामगारांसाठी स्वच्छता गृह उपलब्ध करावे

  • रस्त्यातील खड्डे बुजवा, राडारोडा उचला, दुभाजकांची रंगरंगोटी करा

  • शाळेत शहर स्वच्छतेसाठी जनजागृती करणे

  • अनधिकृत बॅनर होर्डिंग काढून टाकणे

  • सोशल मिडियाद्वारे जनजागृती करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com