Pune : पुन्हा नगरसेवक विरुद्ध आयुक्त

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वाद; भाजपकडून आंदोलनाचा इशारा
Pune : पुन्हा नगरसेवक विरुद्ध आयुक्त
Pune : पुन्हा नगरसेवक विरुद्ध आयुक्त

पुणे : ‘स’ यादीतील कामांवरून स्थायी समिती आणि महापालिका आयुक्त यांच्यात सुरू असलेला वाद मंगळवारी सर्वसाधारण सभेत पोहचला. ‘तुम्ही कराल तेच योग्य आणि आम्ही करू ते अयोग्य हे कसे चालेल’, अशा शब्दात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांना जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिला. तर ‘उत्पन्न मिळणार नाही, हे माहीत असतानाही साडेआठ हजार कोटीचे बजेट सादर केले. त्याची फळे आता भोगा,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

वित्तीय समिती बरखास्त करून अंदाजपत्रकाची १०० टक्के अंमलबजावणी करण्याच्या मागणीवरून स्थायी समिती आणि आयुक्तांत सुरू असलेला वाद सर्वसाधारण सभेतही रंगला. निवडणुकीच्या तोंडावर कामे झाली पाहिजेत यासाठी स्थायी समिती आग्रही आहे. तर उत्पन्न, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन खर्चाचे नियोजन करण्याची भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. स्थायी समितीच्या दोन सभांना महापालिका आयुक्त उपस्थित राहिले नाहीत. सर्वसाधारण सभेत आयत्या वेळाचा हा विषय घेऊन नगरसेवकांनी आयुक्तांना लक्ष केले. शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी आयुक्तांना उद्देशून ‘हा रुसवा सोडा, आता कामांसाठी निधी द्या’, अशी मागणी केली.

Pune : पुन्हा नगरसेवक विरुद्ध आयुक्त
मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा दिसला - देवेंद्र फडणवीस

काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी ‘छोडो कल की बाते, कल की बात पुराणी’, असे गाणे म्हणत आता आयुक्तांकडे वाद मिटवण्याची मागणी केली. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रशासनाकडून कशी उधळपट्टी सुरू आहे, यांची उदाहरणे देत ‘तुमचे ते चांगले आणि आमचे ते अयोग्य असे होत नाही,’ असा टोलही लगावला.

भाजपच्या नगरसेविका राजश्री काळे यांनी प्रभागातील मूलभूत कामे रखडली असून आयुक्तांनी निधी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. आदित्य माळवे यांनीही या वेळी त्यांच्या प्रभागातील रखडलेल्या छोट्या कामांची यादी वाचून दाखवली. हरीदास चरवड, आरती कोंढरे विशाल धनवडे, राजाभाऊ लायगुडे, सिद्धार्थ धेंडे, गणेश ढोरे, सुभाष जगताप, वसंत मोरे आदींची या वेळी भाषणे झाली. अविनाश बागवे यांनी भाजप नगरसेवकांच्या उधळपट्टीवर टीका केली.

Pune : पुन्हा नगरसेवक विरुद्ध आयुक्त
मुलीसोबत मॉर्फ फोटो, शिष्यच महंत नरेंद्र गिरींना ब्लॅकमेल करत होता?

८ हजार कोटींचे उत्पन्न होणार कसे : जगताप

गेल्या चार वर्षांतील महापालिकेला मिळालेल्या उत्पन्नाचे आकडे सांगत सुभाष जगताप म्हणाले, ‘‘वस्तुस्थिती विचारात न घेता आयुक्तांनी आणि स्थायी समितीने अर्थ संकल्प तयार केला. त्याची फळे आता भोगावी लागत आहे. सहा महिन्यांत केवळ २८०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. उरलेल्या सहा महिन्यात ८ हजार कोटीचे उत्पन्न कसे होणार, उत्पन्नाची सर्व साधने बंद केली आणि आता निधी द्या, असे म्हणत आहेत.’’

लोकप्रतिनिधी व प्रशासन हातात घालून काम करत आले आहे. कुठलीही गोष्ट दोन्ही बाजूने ताणली जाऊ नये. यातून सुवर्णमध्य काढावा. येत्या गुरुवारी पक्षनेते, आयुक्त व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित बैठक घेऊन याबाबत मार्ग काढावा.

-मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com