esakal | PMC Budget 2021-22 : पुणे महापालिकेत कोणत्या विभागाला किती तरतूद!

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Budget}

पुणे महापालिकेत आज, स्थायी समितीने धरून सुमारे ८ हजार ३७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. पुणे शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला, आता शहरात कोरोनाची दुसरी लाट आली असताना, महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झालाय.

PMC Budget 2021-22 : पुणे महापालिकेत कोणत्या विभागाला किती तरतूद!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेत आज, स्थायी समितीने धरून सुमारे ८ हजार ३७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. पुणे शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला, आता शहरात कोरोनाची दुसरी लाट आली असताना, महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झालाय. पालिकेने 8 हजार कोटींचा टप्पा पार केलाय. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर जुन्या प्रकल्पांना मार्गी लावण्याचे आणि नव्याने काही प्रकल्प उभारण्याचे आव्हान सध्या महापालिकेत सत्ताधाऱ्यांपुढे आहे. अर्थसंकल्पात कोणत्या विभागासाठी किती तरतूद करण्यात आलीय, हे वाचा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य

 • कोरोनाच्या अनुषंगाने स्वॅबसेंटर, प्रयोगशाळा तपासणी, औषधे उपलब्ध करणे, आवश्यकतेप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध. 
 • नानाजी देशमुख कर्करोग रुग्णालय. 
 • डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रात सुपर स्पेशालिटी युरॉलॉजी/ युरो सर्जरी हॉस्पिटल.
 • शहरातील पाच विभागांतील रुग्णालयांत आयसीयू.
 • नायडू रुग्णालयाच्या विस्‍ताराचे नियोजन करणे, सध्याच्या आरोग्य केंद्रांमध्ये सोयी सुविधा निर्माण करणे.
 • नव्याने काही रुग्णवाहिकांची उपलब्धता.   

घनकचरा व्यवस्थापन

 • रामटेकडी येथे ७५० मेट्रीक टन कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारणे.
 • बावधन व भूगाव येथे १०० मेट्रीक टनाचा प्रक्रिया प्रकल्प.  
 • उरुळी देवाची येथे २०० मेट्रीक टनाचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे. 
 • 'एनसीएपी’च्या माध्यमातून रोड स्वीपर व रोड स्प्रींकलर खरेदी करणे. 
 • वेस्ट टू एनर्जी प्लॅन्टसाठी आवश्‍यक पाण्यासाठी रामटेकडी येथे मलनिःसारण प्रकल्प उभारणे. 

वाहतूक नियोजन

 • शहरात डिसेंबरपर्यंत पाच मार्गांवर मेट्रो धावणार. 
 • शहरा अंतर्गत उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकर मार्गाला गती (एचसीएमटीआर).
 • राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल उभारणे, त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती.  
 • खासगीकरणातून विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्यांची बांधणी. 
 • नऱ्हे, वडगाव, धायरी, खडकवासला भागाला जोडणाऱ्या सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल बांधणे, यासाठी १२० कोटीचा खर्च अपेक्षीत. 

पीएमपी 

 • इलेक्ट्रॉनिक बस घेण्यासाठी पीएमपीकडून निविदाप्रक्रिया राबविण्यासाठी ५० कोटींची तरतूद.
 • पुढील वर्षभर २४३१ बसेसचा ताफा पुणेकरांसाठी उपलब्ध असणार. 
 • बीआरटी एसी इलेक्ट्रीक ३५० बसेस जीसीसी तत्त्वावर व फेमच्या १५० बसेस घेण्याचे नियोजन. 

पथ 

 • शिवणे-खराडी रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, बालभारती-पौड रस्त्याच्या कामाला वेग आणि पुरेशी तरतूद.  
 • नव्याने १० किलोमीटरचे ट्रॅक केले जातील, त्यासाठीही तरतूद. 
 • जंगली महाराज रस्त्याप्रमाणे शहरात नव्याने सहा रस्त्यांवर पादचारी पूरक व सुरक्षिततेच्या दृष्टीने विकसित करणे. 
 • महापालिकांच्या हद्दीत प्रवेश करताना प्रमुख चार रस्त्यांवर सुशोभीकरण करणे, माहिती फलक लावणे. 
 • आंबिल ओढ्यालगतच्या लोकवस्त्यांसाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना. 

उद्यान 

 • कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात नवे मत्स्यालय तयार करणे. 
 • सारसबाग व पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून ३२ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बोटॅनिकल गार्डन निर्माण करणे. 
 • दिव्यांगाविषयी जाणीव निर्माण व्हावी यासाठी शहरात संवेदना पार्क तयार करणार. यामध्ये श्‍वास, वास, श्रवण यांच्या माध्यमातून वनस्पतींचे ज्ञान होईल. 
 • लहान मुलांसाठी खराडी येथे अर्बन ९५ संकल्पनेवर उद्याननिर्मिती. 

भवन रचना 

 • कोथरूड येथे एक्झिबिशन सेंटर व ग. दि. माडगुळकर यांचे स्मारक उभारणे. 
 • मागासवर्गीय विद्यार्थिनी, महिलांसाठी प्रशिक्षण आणि वसतिगृहासाठी तरतूद.
 • कमला नेहरू रुग्णालयात ब्लड बँक विकसित करणे. 
 • बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्माण करणे, कोथरूड येथे शिवसृष्टी उभारणे. 

शिक्षण 

 • शिक्षकांसाठी गुणवत्ता कक्ष स्थापना.  
 • महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना.
 • प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ शाळा स्पर्धा घेणार. 
 • नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्कच्या (एनएसक्यूएफ) उद्द्दीष्टानुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) अद्ययावतीकर करणार. 

नव्या गावांचा विकास 

 • रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरविणे. विशेषत पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प.
 • आरोग्य सुविधांचा भाग म्हणून आरोग्य केंद्रांचा विस्तार.
 • रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी सुविधा.

अतिक्रमण निर्मूलन

 • विविध भागांत गोदाम उभारणे, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, पथारी प्रकल्प पुनर्वसनासाठी नव्याने ओटा स्कीम बांधणे.
 • अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या मालासाठी टॅगिंग करणे व नोंद ठेवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करणे.
 • अतिक्रमणे शोधून कारवाईसाठी स्वतंत्र संगणकप्रणाली करणे.

Edited By - Prashant Patil