वस्‍तुस्‍थितिदर्शकच - राव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

यंदा उत्पन्न कमी मिळाले म्हणजे पुढील वर्षी उत्पन्न कमीच मिळेल, असे नाही, असे सांगून  प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प वस्तुस्थितीला धरूनच आहे, असा दावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. जीएसटी, मिळकत कर आणि बांधकाम विकसन शुल्क हेच महापालिकेचे पारंपरिक उत्पन्नाचे स्रोत आहेत. ते अधिक सक्षम करून पुढील वर्षी उत्पन्नवाढीवर आमचा भर राहणार आहे, असेही ते म्हणाले.

महापालिकेचा पुढील वर्षीसाठीचा (२०१९-२०) सुमारे ६ हजार ८५ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प राव यांनी आज स्थायी समितीला सादर केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले, ‘‘महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहेत. त्यामुळे त्या स्त्रोत्रांचा वापर कार्यक्षम पद्धतीने करावा लागणार आहे. तूट कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून या अर्थसंकल्पात पावले उचलण्यात आली आहेत. तरीदेखील काही प्रमाणात तूट ही राहणारच आहे. पुढील वर्षी उत्पन्न कसे वाढले, याचादेखील विचार करण्यात आला आहे. मिळकत कर आणि पाणीपट्टीतील थकबाकी वसूल करणे, कर आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेणे, आकाशचिन्ह विभागाच्या उत्पन्न वाढीसाठीच्या उपयोजना आदी उपाय सुचविण्यात आले आहेत.’

महापालिकेच्या जागांतून उत्पन्न मिळविणार
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या जागा, ॲमेनिटी स्पेसच्या जागा, ताब्यात आलेल्या सदनिका भाडेतत्त्वावर अथवा लिलावाच्या माध्यमातून विकसित करणे आणि त्यातून उत्पन्न कसे वाढविता येईल, याचादेखील विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांची  संख्या मोठी आहे. त्यांचा वापर, तसेच ते विकसित करणे महापालिकेला शक्‍य नाही. त्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळविणे, हा त्यामागे हेतू असल्याचे राव यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Pune Municipal Budget Saurabh Rao