पुण्याच्या अशक्त आरोग्याचे होईना निदान!

Pune municipal Commissioner Vikram Kumar PMC budget 2021-22 Helath Sector
Pune municipal Commissioner Vikram Kumar PMC budget 2021-22 Helath Sector

पुणे : शहरातील पावणेदोन लाख लोकांना कोरोना झाला, त्यातल्या पावणेपाच हजार जणांचा जीव गेला. कोरोनाच्या साथीत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन नसल्याने रस्त्यात जीव गमविण्याची वेळ काही जणांवर ओढविली; तरीही आरोग्य व्यवस्थेत कडीचाही फरक पडणार नसल्याचे नव्या अंदाजपत्रकावरून दिसत आहे. आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याचे दिसूनही, ती सक्षम म्हणजे काय? त्यावरचे उपाय काय? हे शोधण्यासाठीही सल्लागार नेमण्याची भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयांतील सुधारणांसाठी विकत सल्ला घेण्यात येणार आहे.

महापालिकेची रुग्णालये, दवाखान्यांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करून सुधारणा करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, हा अभ्यास महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांकडून करणे शक्य नसल्याची कबुलीच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

PMC Budget 2021-22 : पुणे महापालिका बजेट ठळक मुद्दे काय आहेत वाचा  

पुण्यात स्वाइन फ्लू आणि आता कोरोनामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा अशक्य असल्याचे पुढे आले. विशेषत: रुग्णवाहिका, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरही या यंत्रणेकडे नव्हते. गेल्या १० वर्षांत आरोग्य यंत्रणेवर साडेतीन-चार हजार कोटी रुपये खर्चूनही अत्यावश्यक उपचार उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेतले गेले. तेही पुरेसे ठरत नसल्याने नवे कोविड हॉस्पिटल आणि जम्बो कोविड केअर सेंटर उभारले गेले.

अर्थात, या साथीत महापालिकेच्या रुग्णालयांत सर्व प्रकारचे उपचार पुरविण्याची बाब अधोरेखित झाली. त्यामुळे शहर विकासाची दिशा ठरविण्यात महापालिकेच्या अंदाजपत्रकात मात्र आरोग्य व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. दुसरीकडे जुने दवाखाने, रुग्णालयांमधील सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे वर्षाला सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा कर भरणाऱ्या पुणेकरांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अशक्तच राहणार असल्याचे अंदाजपत्रक आणि आयुक्तांच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य सुविधेचा विस्तार कसा करणार, यावर केवळ नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीला वेग देत असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.
PMC Budget 2021-22 : ​पाचशे इलेक्ट्रीक बस खरेदी करणार

आरोग्य सुविधेत नेमके कोणते आणि काय बदल करायला हवेत, हे निदर्शनास आलेले नाही. ते जाणून घेतल्यानंतरच नवे उपाय अमलात आणले जातील. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी सल्लागारही नेमला जाणार आहे. त्यामुळे या व्यवस्थेत सुधारणा करणे सोपे होईल.
- विक्रम कुमार,आयुक्त, पुणे महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com