Pune Rain : पुण्यातील पावसात महापालिकेच्या ठेकेदाराचाच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

महापालिकेचे ठेकेदार असलेले किशोर गिरमे यांची कार पावसाच्या पाण्यात वाहून गेली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. इतरही काही जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गिरमे हे नांदेड सिटीमध्ये राहायला होते. ते घरी जात असताना ही घटना घडली. 

पुणे : पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे ओसंडून वाहत असताना सिंहगड रस्त्याजवळील वीर बाजी पासलकर पुलावरून एक कार वाहून गेल्याने, कारमधील महापालिकेच्या ठेकेदाराचाच मृत्यू झाला आहे.

पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना सुटी 

पुणे शहरात बुधवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसात अनेक ठिकाणी ओढ्यांमध्ये चारचाकी वाहुन गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढणार हे निश्चित आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू अरणेश्वर कॉलनी येथे झाला आहे.

पुणेकरांनो सावधान! आजपासून पाच दिवस पावसाची शक्‍यता 

महापालिकेचे ठेकेदार असलेले किशोर गिरमे यांची कार पावसाच्या पाण्यात वाहून गेली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. इतरही काही जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गिरमे हे नांदेड सिटीमध्ये राहायला होते. ते घरी जात असताना ही घटना घडली. 

पुण्यात ढगफुटी; 87.3 मिमी पावसाची नोंद; आठ वर्षांतील उच्चांक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune municipal contractor dead in Pune flood