डेंगीचा प्रादुर्भाव रोखताना महापालिकेच्या नाकीनऊ; दंड आकरण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

सध्या शहरात डेंगीचे चारशे रूग्ण आहेत. सोसायट्या, बांधकामाची ठिकाणे, हाॅटेल, दुकानांच्या मालकांना हा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात किमान पाचशे ते १० हजार रुपयांचा दंड केला आहे. 

पुणे : पाऊस पाठ सोडत नसल्याने डेंगीच्या रूग्णांचे प्रमाण रोखताना महापालिकेच्या नाकीनऊ आले आहे. डेंगीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने महापालिकेने पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करून दोन हजार लोकांना नोटीसा पाठविल्या असून, त्यातील १४५ जणांकडून सुमारे ३ लाख ७० हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

सध्या शहरात डेंगीचे चारशे रूग्ण आहेत. सोसायट्या, बांधकामाची ठिकाणे, हाॅटेल, दुकानांच्या मालकांना हा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात किमान पाचशे ते १० हजार रुपयांचा दंड केला आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून पाणी साचणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. परंतु काही ठिकाणी महिनाभरापासून पाणी साचल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात आधी नोटीस दिली होती; मात्र दुर्लक्ष केल्याने दंड केला आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune Municipal corporation Begin to impose penalties for preventing dengue outbreak