व्यंकय्या नायडूंच्या कार्यक्रमाचा भाजपकडून 'इव्हेंट'

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 21 जून 2018

भाजप उपराष्ट्रपतींचा कार्यक्रमदेखील राजकीय हेतूने करीत असून, पुणेकरांना दिलेल्या पत्रिकेत मात्र विरोधकांना डावलल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. 
नव्या इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्या (ता.21) होणार आहे. त्यानिमित्ताने महापालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. दोन्ही पत्रिकांवर महापालिकेचा लागो वापरण्यात आला आहे. मात्र, त्यातील उपस्थितांची नावे मात्र वेगवेगळी आहेत. एका पत्रिकेत विरोधी पक्षांची नावेच नसल्याचे दिसून आले आहे.

पुणे : आधीच अर्धवट काम असताना इमारतीच्या उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप होत असताना भाजपने या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे झेंडे आणि फलकबाजी करून हा भाजपचा इव्हेंट असल्याचे दाखवून दिले आहे. कार्यक्रम सुरु होण्यास काही तास बाकी असताना इमारत आणि परिसरात तयारीची लगबग सुरु आहे. भाजपने देखावा करण्यासाठीच या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महापालिकेच्या इमारतीची पाहणी केली आणि इमारतीची कामे अर्धवट असल्याचे म्हटले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते महापालिकेच्या नव्या इमारतीच्या आज (गुरुवार) होणाऱ्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची "इव्हेंट' करण्याची भूमिका स्पष्ट झाली आहे. या एकाच कार्यक्रमाच्या दोन निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. महापालिकेच्या पत्रिकेवर पदाधिकाऱ्यांसह विरोधकांच्या नावांचा उल्लेख आहे. तर, दुसऱ्या पत्रिकेवर मात्र आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांची नावे छापली आहेत. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राजशिष्टाचाराचा भंग होऊनही महापालिका अर्थात भाजप नेत्यांनी धडा घेतला नसल्याचे दिसत आहे. 

भाजप उपराष्ट्रपतींचा कार्यक्रमदेखील राजकीय हेतूने करीत असून, पुणेकरांना दिलेल्या पत्रिकेत मात्र विरोधकांना डावलल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. 
नव्या इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्ताने महापालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. दोन्ही पत्रिकांवर महापालिकेचा लागो वापरण्यात आला आहे. मात्र, त्यातील उपस्थितांची नावे मात्र वेगवेगळी आहेत. एका पत्रिकेत विरोधी पक्षांची नावेच नसल्याचे दिसून आले आहे.

मुळात, इमारतीच्या बांधकामावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच, उपराष्ट्रपतींचा कार्यक्रमाच्या पत्रिकेवरूनही गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमात नाराजीचे सावट निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात बोलताना महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, "" महापालिकेच्या कार्यक्रमातही भाजपा राजकारण करीत आहे. उपराष्ट्रपतींचा कार्यक्रम असल्याने काही संकेत पाळणे अपेक्षित होते. मात्र, भाजपा त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत आहे. विरोधकांना गृहीत धरले जात नाही. महापालिकेचे कार्यक्रमदेखील सत्ताधारी भाजपा मिरविण्यासाठी करतात.'' 

गेल्या वर्षभरात महापालिका म्हणून कोणतेच ठोस काम दिसत नसताना अनावश्‍यक वाद मात्र सत्ताधारी भाजपाने वाढवले आहेत. आता पदाधिकारी बदलण्याची भाषा केली जात आहे. मात्र पदाधिकारी बदलून काय होणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Pune Municipal Corporation building inauguration BJP create event