पुणे : महापालिकेचा दुबार खर्च टाळण्यासाठी सॉफ्टवेअरचे नियंत्रण

महापालिका प्रशासनाने'इंटीग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टीम’ या संगणक प्रणालीचा वापर करणार
software
softwaresakal

पुणे : महापालिकेत मुख्य खात्यापासून ते क्षेत्रीय कार्यालयाच्या कामांचा हिशोब ठेवणे शक्य व्हावे आणि एकाच कामासाठी दोन वेळा होणारा खर्च टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने'इंटीग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टीम’ या संगणक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. पथ, विद्युत, पाणी पुरवठा, मलःनिसारण, भवन या अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत विभागात याचा वापर केला जाणार आहे.

महापालिकेते पदपथावरील सिमेंटचे ठोकळे चांगले असतानाही बदलले जातात, त्याच त्याच ठिकाणी डांबरीकरण केले जाते, सांडपाणी वाहिनी नेमके कोठे टाकली हे सांगता येत नाही. न केलेल्या कामाचीही बिले काढली जातात. गेल्या वर्षभरात विद्युत विभागात निविदा न काढताच थेट १ कोटी रुपयांचे बिल काढण्याचा प्रयत्न झाला. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एकाच कामाचे दोन बिले काढली. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत धायरी रस्त्यावर उड्डाणपुलावर दिवे लावायच्या कामातून परस्पर पथदिवे लावण्याचा उद्योग कनिष्ठ अभियंत्याने व ठेकेदाराने केला. अशा प्रकारे शहरात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे होत आहेत.

महापालिकेत मुख्य खात्यांकडून सुमारे ४ हजार ५०० पूर्वगणक तयार करून निविदा मागविल्या जातात तर क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर हाच आकडा ६ हजाराच्या पुढे जातो. वर्षाला ३५०० कोटी पेक्षा जास्त रकमेच्या निविदा काढल्या जातात. या हजारो कोटीच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून ‘इंटीग्रटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टीम’ नावाची संगणक प्रणाली विकसीत केली आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागातील गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती संकलीत करण्यात आलेली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षातील काम आणि त्यासाठी असलेली तरतूदही असणार आहे.

असा होणार या संगणक प्रणालीचा वापर

  • ज्या ठिकाणी काम करायचे आहे तेथे जीआयएस मॅपने टॅग केले जाईल.

  • त्यामुळे यापूर्व केलेल्या कामाची कुंडली उपलब्ध होणार.

  • एकाच कामासाठी दुबार खर्च होणार नाही.

  • संगणक प्रणालीत प्रकल्प सल्लगार, ठेकेदार यांनाही लॉगईन देता येणार

  • कामासंदर्भात सूचना देणे, गुणवत्ता तपासणे, पूर्वगणक पत्रक सादर करणे, कामाची बिले सादर करणे, तपासणी करणे शक्य

  • ही प्रणाली भविष्यात सॅप प्रणालीद्वारे मुख्य लेखापाल कार्यालयाशी जोडली जाणार

  • पूर्णगणक पत्रक ते अंतिम बिल काढे पर्यंतची प्रक्रिया पेपरलेस होईल

  • संगणकासह मोबाईल ॲपद्वारेही ही प्रणाली वापरता येणार

‘‘महापालिकेच्या कामात सुसुत्रता यावी, प्रत्येक कामाचा दर्जा तपासता यावा, एकाच कामासाठी होणारा दुबार खर्च टाळावा यासह प्रसासकीय सुधारणांसाठी ही संगणक प्रणाली उपयुक्त आहे. याचा वापर कसा करावा यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्व अभियंत्याना प्रशिक्षण दिले जाणार आहे.’’

विक्रम कुमार, आयुक्त

‘‘अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत पाणी पुरवठा, मलःनिसारण, विद्युत यासह इतर विभागांसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.महापालिकेच्याकामाची गुणवत्ता वाढेल, नागरिकांनाही यामध्ये तक्रारी करण्यासाठीची सुविधा उपलब्ध असेल.’’

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com