पुणे शहरातील ५८ पैकी २९ प्रभागात महिलांचे वर्चस्व असणार

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता ३१ मे रोजी ५० टक्के महिला आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Summary

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता ३१ मे रोजी ५० टक्के महिला आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे.

पुणे - पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता ३१ मे रोजी ५० टक्के महिला आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे. तीन सदस्यांचा एक प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन जागा या महिलांसाठी आरक्षीत असणार आहेत. त्यामुळे अनेकांचे भविष्य टांगणीला लागेल आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग आहे. ५८ प्रभागांपैकी ५७ प्रभागात तीन सदस्य आहेत. तर एका प्रभागात दोन सदस्य आहेत. १७३ जागांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ जागा अनुसूचित जातीसाठी आणि ए जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने १३ मे रोजी पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. त्यामध्ये प्रारूप प्रभाग रचनेतील ३२ प्रभागांमध्ये बदल झालेले आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमधील राजकीय गणित बदलले आहेत.

त्यानंतर २०११ च्या लोकसंख्येला आधार माणून अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण असलेले २५ प्रभाग कोणते याचीही यादी संकेतस्थळावर जाहीर केली. मात्र, महिलांचे आरक्षण कधी जाहीर होणार याबाबत स्पष्टता नव्हती. राज्य निवडणूक आयोगाने महिला आरक्षणाची सोडत जाहीर करण्याचे वेळापत्रक आज (ता. २३) जाहीर केले असून, त्याचे पत्र पुणे महापालिकेला मिळाले आहे.

आकडे बोलतात

- एकूण प्रभाग ५८

- एकूण सदस्य - १७३

- महिलांसाठी आरक्षीत - ८७

- तीन पैकी जागा दोन महिलांसाठी आरक्षीत असेलेल प्रभाग - २९

असा असेल सोडतीचा कार्यक्रम

- २७ मे - सोडत काढण्यासाठी प्रसार माध्यमांद्वारे नागरिकांना माहिती देणे

- ३१ मे - अनुसूचित जाती, जमाती, व सर्वसाधारण महिला यांच्या आरक्षित जागा निश्‍चीत काढण्यासाठी सोडत काढणे

- १ जून - सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे

- १जून ते ६ जून - प्रभागनिहाय आरक्षणावर हरकती व सूचना मागविणे

- १३ जून - प्रभाग निहाय हरकती व सूचनांवर विचार करून अंतिम आरक्षण परिशिष्ट - ड मधील नमुन्यात राजपत्रात सादर करणे.

‘महिलांचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी ३१ मे रोजी सोडत काढली जाणार आहे. त्याचे स्थान व वेळ लवकरच जाहीर केले जाईल.’

- डॉ. यशवंत माने, उपायुक्त, निवडणूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com