पुणे महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे :  महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी मुख्यसभेत सादर केले. 2018-19 चे आयुक्तांचे अंदाजपत्रक 5 हजार 397 कोटी रुपायांचे तर स्थायी समितीचे अंदाजपत्रक 5 हजार 887 कोटी रुपयांचे होते.

पुणे :  महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले. 2018-19 चे आयुक्तांचे अंदाजपत्रक 5 हजार 397 कोटी रुपायांचे तर स्थायी समितीचे अंदाजपत्रक 5 हजार 887 कोटी रुपयांचे होते.

नवीन योजना कात्री लावत प्रामुख्याने शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एचसीएमटीआर रस्ता, शिवणे- खराडी रस्ता, कात्रज कोंढवा रस्त्यांना प्राधान्य देण्यासह, नदीसुधार योजना, मेट्रो प्रकल्प, सायकल योजनेस या अंदाजपत्रकात प्राधान्य देण्यात आले आहे. दरम्यान, या वर्षी महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करायचा असल्याने आयुक्तांनी आपले अंदाजपत्रक मागील वर्षापेक्षा सुमारे 300 कोटींनी वाढविले आहे.

या अंदाजपत्रकात संकल्प ते सिद्धी आणि राहण्या योग्य शहराचा दर्जा कायम ठेवणे, ई गव्हर्नन्स, 11 गावांना समान विकास निधी, भूगर्भातील पाण्याची वाढ करणे, नैसर्गिक साधन संपत्तीचा सुनियोजित विकास, फलनिष्पत्ती मूल्यमापन त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून करणार, आर्थिक शिस्त यावर भर दिला जाणार आहे.

- नागरिकांची मते, तक्रारींसाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करणार
- सिंहगड रस्ता धायरीला वाय आकाराचा पूल
- औंध सांगावी रस्त्यावर नवा आणखी एक पूल
- राजाराम पूल येथे आर्ट प्लाझा
- हडपसर आणि रामटेकडी येथे भुयारी मार्ग. बोपोडी चौकात भुयारी मार्ग
- वडगाव शेरी येथील नवीन पार्किंग तळ विकसित करणार
- 12 जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करणार
- 100 किलोमीटरचे रस्ते पाहिल्या टप्प्यात सुरक्षित करणार
- 1400 किलोमीटर रस्त्याचे रोड असेंट मॅनेजमेंट सिस्टम नुसार रस्त्याचा बदल करणार
- 100  किलोमीटर रस्त्यावर स्मार्ट स्ट्रीट करणार
- 1 जानेवारी 2020 पासून उरुळी देवाची यातील कचरा डेपो बंद करणार
-  एचसीएमटीआर रस्ता 211 कोटी रुपयांची तरतूद
- असा होणार 2019-20 चा खर्च

महापालिका खर्च
सेवकवर्ग 1665 कोटी
कर्ज- व्याज परतफेड 78 कोटी
वीज, देखभाल दुरुस्ती 255 कोटी
पाणी खर्च 170 कोटी
इतर खर्च 1095 कोटी
औषध – घसारा 200 कोटी
प्रभागस्तरीय- 34 कोटी
क्षेत्रीय कार्यालय 82 कोटी
भांडवली कामे 1843 कोटी
पाणी पुरवठा प्रकल्प 707 कोटी

असे येणार 6085 कोटीचे उत्पन्न 
एलबीटी अनुदान 200 कोटी
जीएसटी अनुदान 1808 कोटी
मिळकतकर 1721 कोटी
पाणीपट्टी 450 कोटी
अनुदान 239 कोटी
बांधकाम शुल्क 750 कोटी
कर्ज रोखे 200 कोटी 
इतर 602 कोटी

– पीएमपीसाठी 375 कोटी तरतूद
– 200 कोटीचे नवे कर्ज रोखे घेणार
– नदी सुधारणासाठी 80 कोटी
– उत्पन्नात 30 टक्के वाढ करणार
– नवीन कर आकारणी मिळकती वाढविणार
– कर रचना बदलणार

Web Title: Pune Municipal Corporation emphasis on infrastructure