फ्लेक्स लावण्याच्या भूमिकेवरून पुणे पालिकेचे घुमजाव

pmc
pmc

खडकवासला : अनाधिकृत फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याची मागणी महापालिकेच्यावतीने पोलिसांना करण्यात आली होती. परंतु, दोन दिवसानंतर अचानकपणे महापालिकेने घुमजाव करीत अशा प्रकारे नागरिकांवर कारवाई करू नये त्यांना फक्त समज देऊन सोडून देण्यात यावे असे पत्र आता दाखल केली आहे.

दहीहंडीच्या अगोदरच्या रात्री सिंहगड रस्त्यावर फ्लेक्स लावण्याच्या वादातून अजय घडशी याचा खून झाला होता. त्यानंतर, महापालिकेची सिंहगड रस्ता परिसरातील अनधिकृत फ्लेक्सवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याचा निर्णय झाला त्यानुसार, महापालिकेच्या वतीने अनधिकृत फ्लेक्स असलेल्या ठिकाणांची नावे आणि मंडळांची नावे पोलिसांना एका पत्राव्दारे दिली होती. त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीचे पत्र 3 सप्टेंबर रोजी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष तांदळे यांनी सिंहगड रस्ता व दत्तवाडी पोलिसांना दिले होते यामध्ये महापालिका अधिनियम आणि जाहिरात नियंत्रण नियम यानुसार महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. असणाऱ्या पत्राबरोबर उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत देऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी केली होती या संदर्भात वारंवार तक्रारी देऊनही पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नाही असा ठपका पोलिसांवर ठेवला होता. या पत्रानुसार संबंधित मंडळांवर गुन्हे नोंदवून पुढील कारवाई करावी. परिणामी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे आदेशाची अंमलबजावणी होईल तसेच न्यायालयाच्या अवमानाचा कारवाईला सामोरे जावे लागणार नाही यामुळे ही कारवाई करावी असे या पत्रात म्हटले होते.

महापालिकेने आज पुन्हा एक पत्र पोलिसांना दिले. यामध्ये फ्लेक्स लावणाऱ्या मंडळांनी महापालिकेला सर्व फ्लेक्स करण्यासाठी सहकार्य केले आहे. सर्व फ्लेक्स काढले असल्याने यामुळे त्या मंडळांवर गुन्हे दाखल करणे संयुक्तिक होणार नाही. सामाजिक व धार्मिक कार्यक्रम असल्याने संबंधित मंडळांना अनाधिकृत पलेस लावण्याबाबत समज देण्यात यावी. असे या पत्रातील मजकूर आहे यामुळे आता पोलीस अडचणीत आलेले आहेत. 

पोलीस अडचणीत
पालिकेने 3 सप्टेंबरला पत्र दिल्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांना 4 मार्च रोजी 23 पैकी 21 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर आज महापालिकेचे सहायक आयुक्त नि दिलेल्या पत्रानुसार गुन्हे दाखल करू नये. असे पत्र पाठविल्याने पोलीस चांगलेच अडचणीत आले आहे. तर दुसऱ्या बाजूला शहराचे विद्रुपीकरण होत असताना अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांना कारवाई करू नये हे सांगणे किती संयुक्तिक आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com