पाच वर्षांत पुणे महापालिकेने केली दुप्पट पाणीपट्टी

सध्या शहरात पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापले असतानाच ही वस्तुस्थिती समोर आली.
Water
Water sakal
Summary

सध्या शहरात पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापले असतानाच ही वस्तुस्थिती समोर आली.

पुणे - समान पाणी पुरवठा योजनेसाठी (Water Supply Scheme) महापालिकेने (Pune Municipal) दरवर्षी पाणीपट्टीत (Water Tax) केलेली पंधरा टक्के वाढ यावर्षी संपुष्टात येत आहे. परंतु गेल्या पाच वर्षांत पाणीपट्टीत जवळपास शंभर टक्के वाढ झाली असून प्रकल्प मात्र पूर्ण झाला नाही. त्यामुळे निवासी मिळकतींसाठी ९०० ते ११०० रुपयांपर्यंत असलेली वार्षिक पाणीपट्टी १७६३ ते ४ हजार ८६७ रुपयांपर्यंत वाढली आहे. यावरून प्रकल्प वेळेत मार्गी लावण्याऐवजी केवळ महसूल जमा करण्याकडेच महापालिकेने लक्ष दिले असल्याचे समोर आले आहे.

सध्या शहरात पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापले असतानाच ही वस्तुस्थिती समोर आली. शहरातील सर्व भागातील नागरीकांना समान पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने महापालिकेने ही योजना हाती घेतली. या योजनेसाठी येणारा खर्च वसूल करण्यासाठी महापालिकेने २०१६-१७ मध्ये पाणीपट्टीत दरवर्षी पंधरा टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यास मान्यता दिल्यानंतर पहिल्या वर्षी १२ टक्के वाढ आणि त्यानंतर सलग चार वर्ष पंधरा टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे गेल्या पाच वर्षात निवासी आणि बिगर निवासी मिळकतींच्या पाणीपट्टीत जवळपास शंभर टक्के वाढ झाली. मात्र अद्यापही या प्रकल्पाचे काम पन्नास टक्केही पूर्ण झाले नाही. दरवर्षी पाणीपट्टीत पंधरा टक्क्यांनी होणारी वाढ या वर्षी संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात (२०२२-२३) ही वाढ रद्द होणार आहे.

शहराचा मध्यभाग व उपनगरांच्या परिसरातील पाणीपुरवठ्याचा आढावा सकाळने घेतला. अनेक भागात पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होत असल्याचे निदर्शनास आले. तर काही भागात टँकरने पुरवठा करावा लागत असल्याचे दिसून आले.

एकूणच शहरातील स्थिती समाधानकारक नसल्याने आंदोलन, उपोषण होत आहे. ही वस्तुस्थिती असताना दुसरीकडे मात्र दरवर्षी पाणीपट्टीत वाढ करून या प्रकल्पासाठी महापालिकेने करोडो रुपयांचा महसूल जमा केला. पुणे शहरात निवासी आणि बिगर निवासी अशा मिळून सुमारे साडेअकरा लाख मिळकती आहेत. त्या सर्वांना या दरवाढीचा फटका बसला आहे.

निवासी मिळकतींसाठी पाणीपट्टी

५००० आणि त्यापुढील - २५ टक्के किंवा २५०० यापैकी जी कमी रक्कम असेल ती - ४८.६७ टक्के किंवा ४८६७ यापैकी जी कमी रक्कम असेल ती

समान पाणीपुरवठा प्रकल्पाची सद्यःस्थिती

  • १,३४५ किलोमीटर नव्याने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्या

  • ६७४ किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे पूर्ण झालेले काम

  • ८२ बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या

  • ३९ आतापर्यंत पूर्ण झालेल्या टाक्या

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे दरमहिन्याला सोसायटीत दररोज दोन टँकर घ्यावे लागतात. त्यामुळे महिन्याला १५०० रुपये मेन्टेनन्स प्रत्येक सदनिकाधारकाला द्यावा लागतो. त्यामध्ये सर्वाधिक खर्च हा पाण्यासाठी आहे. महापालिकेने पाणीपट्टीत वाढ केली आणि दुसरीकडे पाणीपुरवठाही करीत नाही, हा कोणता न्याय आहे?

- अमोल ब्रह्मे, धायरी

गेल्या काही वर्षांपासून आमच्या सोसायटीला अतिशय कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. एकीकडे करात वाढ केली जाते, मात्र त्या तुलनेत सुविधा पुरविल्या जात नाही.

- राजश्री कुलकर्णी, बावधन खुर्द

भांडारकर, प्रभाग, विधी महाविद्यालय रस्ता या परिसरातही पाणीपुरवठा कमी दाबानेच होत आहे. महापालिकेने दावा केला असला, तरी पाणीपुरवठ्यात कोणतीही सुधारणा झाली नाही.

- दिलीप हर्डीकर, भांडारकर रोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com