पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज

राजकुमार थोरात
सोमवार, 25 जून 2018

पालखी सोहळ्यासाठी झेडपीने स्वतंत्र वैद्यकीय पथकांची स्थापना केली असून ११० वैद्यकीय अधिकारी व ३३६ कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत.

वालचंदनगर - संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून पालखी सोहळ्यासाठी ११० वैद्यकीय अधिकारी व ३३६ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असल्याची माहिती झेडपी आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. 

संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे ५ जुलै व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे ६ जुलै रोजी प्रस्थान होत आहे. दोन्ही पालखी सोहळे पुणे जिल्हातील ६ तालुक्यातील ८० गावामधून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. ६ तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील २३ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरातुन पालखी सोहळे जाणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी झेडपीने स्वतंत्र वैद्यकीय पथकांची स्थापना केली असून ११० वैद्यकीय अधिकारी व ३३६ कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. तसेच ४ फिरते वैद्यकीय पथक, ८७ औषधउपचार केंद्रे, १०८ च्या ३० अॅब्युलन्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. पालखी महामार्गावर ३६४३ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. तसेच ४५ ठिकाणी टॅंकर भरण्याची सोय अाहे.१०७४ हाॅटेल असून आरोग्य विभागाच्या वतीने सर्व ठिकाणाची पाहणी करुन पाण्याचे नुमने घेण्याचे नियोजन केले आहे. सर्व ग्रामपंचायतींना टीसीएल पावडर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.   

३५ लाख रुपयांच्या निधीची तरतुद
संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी झेडपीने ३५ लाख रुपयांची तरतुद केली आहे. यामध्ये २० लाख रुपयांची औषधे खरेदी,७ लाख रुपयांचे औषध किट, आरोग्य दुत योजना व प्रसिद्धी साठी व ८ लाख रुपये पाणी शुद्धीकरण, अॅब्युलन्यस व इंधणासाठी वापरण्यात येणार असल्याचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले.

दिंडी प्रमुखसंना औषधाचे किट...
दोन्ही पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना औषधांची पुरेशी किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याचा फायदा दिंडीतील सहभागी वैष्णवांना होणार आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व अतिरिक्त जिल्हा  आरोग्य अधिकाऱ्यांची पर्यवेक्षणासाठी स्वतंत्र दोन पथके तयार करण्यात आली असून नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: pune municipal corporation health department is ready for palkhi sohla