पुणे : फ्लेक्‍सवरील कारवाईसाठी ९० लाखाची निविदा

शहरातील फ्लेक्स काढण्यासाठी बिगारी व इतर मनुष्यबळ नसल्याने महापालिकेने एप्रिल २०२२ ते मार्च २३ या वर्षभरासाठी तब्बल ८९ लाख रुपयांची निविदा काढली
pune Municipal Corporation issue Tender Rs 90 lakhs for action remove Flex
pune Municipal Corporation issue Tender Rs 90 lakhs for action remove Flexsakal

पुणे : शहरातील फ्लेक्स काढण्यासाठी बिगारी व इतर मनुष्यबळ नसल्याने महापालिकेने एप्रिल २०२२ ते मार्च २३ या वर्षभरासाठी तब्बल ८९ लाख रुपयांची निविदा काढली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळासाठी निविदा काढल्यानंतर परिणामकारक कारवाई होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील प्रत्येक रस्त्यावर, चौकात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार यांचे राजकीय व व्यावसायिक फ्लेक्स लावले जात आहेत. यामुळे पादचारी मार्ग, रस्त्यांवर चालण्यासाठी जागाही राहत नाही. अशी स्थिती असताना महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याची टीका होते. क्षेत्रीय कार्यालयांकडे मनुष्यबळ नाही म्हणून कारवाई करण्यावर मर्यादा येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. ‘सकाळ’ने गेल्या चार दिवसांपासून शहरातील फ्लेक्सचा प्रश्‍न गांभीर्याने मांडून प्रशासनाला जागे केले व चमकोगिरी करणाऱ्यांना लगाम लावला आहे. याच पद्धतीने पुढेही काम करण्यासाठी प्रशासनाने निविदा काढली आहे.

या निविदेमध्ये शहराच्या विविध भागात उभारण्यात येणारे अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स यासह इतरावर कारवाई करण्यासाठी ११ एप्रिल पर्यंत अर्ज मागविले आहेत. त्यासाठी वर्षभरासाठी ८० लाख २७ हजार रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, मनुष्यबळ कमी असल्याचे कारण वारंवार समोर केले जात होते. महापालिकेकडून आता निविदा काढण्यात आल्याने भविष्यात परिणामकारक कारवाईची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com