पुणे : नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांच्या नाल्यात तुंबले महापालिकेचे दोन कोटी

सकाल वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

फुरसुंगी, उरुळी देवाची, साडेसतरा नळी आणि केशवनगर या चार गावांमध्ये इतका खर्च करण्यात येणार आहे. मात्र, ही योजना मांडताना गावांमध्ये नेमकी कुठे आणि किती लांबीचे नाले आहेत ? हे एकाही खात्याला ठाऊक नाही. दुसरीकडे, शहरातील नाल्यांच्या दुरवस्थेने घरे वाहून गेली तरी त्यांची सफाई झाली नाही; तेव्हा गावांमधील नाले साफ होणार ? असा प्रश्‍न आहे.

पुणे : महापालिकेत समावेश झालेल्या नव्या गावातील गावकऱ्यांना अजून रस्ते, पाणी मिळेनासे झाले पण, या गावांतील नाले तुंबल्याचे दाखवून महापालिका प्रशासनाने तब्बल दोन कोटी रुपये जिरविण्याची योजना मांडली आहे. फुरसुंगी, उरुळी देवाची, साडेसतरा नळी आणि केशवनगर या चार गावांमध्ये इतका खर्च करण्यात येणार आहे. मात्र, ही योजना मांडताना गावांमध्ये नेमकी कुठे आणि किती लांबीचे नाले आहेत ? हे एकाही खात्याला ठाऊक नाही. दुसरीकडे, शहरातील नाल्यांच्या दुरवस्थेने घरे वाहून गेली तरी त्यांची सफाई झाली नाही; तेव्हा गावांमधील नाले साफ होणार ? असा प्रश्‍न आहे.
 
सध्या शहरात पाऊस होत असल्याने सुरक्षिततेसाठी ओढ्या-नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हद्दीलगतची 11 गावे महापालिकेत समाविष्ट होऊन दोन वर्षे लोटली तरीही पुरेशा पायाभूत सुविधा मिळाल्याची नसल्याची गावकऱ्यांची ओरड आहे. विशेषत: नवे, रस्ते, जुन्या रस्त्यांची डागडुजी, पिण्याची पाणी, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन पुरविण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, या कामांना फारसे प्राधान्य न देता महापालिकेने मात्र, गावांतील ओढे-नाले तुंबल्याचे निदर्शनास आले आहे.

आता पावसाळा संपली तरी, नाल्यांच्या सफाईची घाई करीत, चार गावांतील नाल्यांच्या स्वच्छतेचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडण्यात आला आहे. त्यापलीकडे जाऊन ही कामे तातडीने करणे अपेक्षित असल्याचे सांगत निविदा मंजूर करण्याचा घाईही करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रस्तावाला स्थायी समितीच्या गुरुवारच्या (ता.7) मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune Municipal Corporation Two crores Stuck in the drainage of newly incorporated villages