पुणे महापालिका करणार घरांची निर्मिती: कधी आणि कोठे?

ज्ञानेश सावंत
रविवार, 31 मे 2020

कशी होणार अंमलबजावणी?

  • पुढील पाच वर्षांचा कालावधी ठरविणार.
  • झोपडपट्टीवासीयांना वेळेत घर देण्यासाठी काँक्रिटच्या भिंतींचे बांधकाम.
  • घरांचा दर्जा राखताना मोडतोड करून नवे बदल करता येणार नाहीत.
  • ही घरे भूकंप आणि अग्निप्रतिबंधक असणार. 
  • गरजूंसाठी घरे बांधण्यासाठी महापालिकाच घेणार पुढाकार.

पुणे - पुणे ‘स्लम फ्री सिटी’ करताना पुढील पाच वर्षांत तब्बल १०० हेक्‍टर जागेवर ५० हजार नव्या घरांची उभारणी करण्यासाठी महापालिका आराखडा तयार करणार आहे. या योजनेतून वर्षाकाठी साधारपणे १० हजार घरांच्या बांधणीसाठी काँक्रिटच्या भिंती बांधकामाचा पर्याय निवडला जाणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या जागेत प्रकल्पाची उभारणी होईल.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहर गेल्या काही वर्षांत चहूबाजूंनी विस्तारले; तरीही मध्यवस्ती आणि झोपडपट्‌ट्‌यांमधील लोकसंख्येची घनता वाढत आहे. परिणामी, पायाभूत सुविधांवर ताण येऊन रहिवाशांना नव्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात कोरोनासारखा आजारही आशा लोकवस्त्यांमध्ये वाढत असल्याचे रुग्णांच्या आकडेवारीनिशी पुढे आले आहे. भविष्यात वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. दाट लोकवस्तीत कोरोनाच्या वाढीचा वेग अधिक असल्याने खबरदारी म्हणून महापालिकेच्या बांधकाम खात्याने ‘स्लम फ्री सिटी’ची योजना आखून संपूर्ण शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

विद्यार्थ्यांनो, आता 'एन्ट्रान्स एक्झाम'च्या तयारीला लागा; पुणे विद्यापीठातर्फे वेळापत्रक जाहीर!

शहरातील प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पुरेशा आणि किमान सुविधा असलेली घरे उपलब्ध होतील; हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच, संपूर्ण शहराचे आरोग्यही जपता येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा करून त्याची अंमलबजावणीची दिशा ठरविण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य घेतले जाईल. 
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

आता विद्यार्थी म्हणतात, गाव नको, पुणचं बरं! कारण...

या योजनेची परिणामकारकता वाढविण्यासाठी जागामालक म्हणजे खासगी, सरकारी आणि झोपडपट्टीधारकाचा सहभाग बंधनकारक हवा. त्यानंतर पात्र लोकांचे तात्पुरते स्थलांतर करून बांधकामाला वेग देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. ही योजना एका मर्यादित काळात पूर्ण करून उद्देश साध्य करता येईल.
- संदीप महाजन, वास्तुविशारद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Municipal Corporation will construct houses