पुणे महापालिकेच्या ताफ्यात लवकरच 50 'ई-कार' 

e-Car.jpg
e-Car.jpg

पुणे : प्रदूषण रोखण्यासाठी व तुलनेते कमी खर्च यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह वैयक्तिक वापरासाठी ''इलेक्‍ट्रॉनिक व्हेइकल'ची बाजारात मागणी वाढत आहे. याची भुरळ आता महापालिकेलाही पडली असून, पालिकेच्या ताफ्यात लवकरच भाडेतत्त्वावरील 50 ई-कार दाखल होणार आहेत. यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. 

महापालिकेला अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह कचरा वाहतूक, अतिक्रमण कारवाई, क्षेत्रीय कार्यालये व पाणीपुरवठ्याची कामे यांसह अन्य कारणांसाठी वाहनांची गरज पडते. महापालिकेकडे सध्या स्वतःच्या मालकीची विविध प्रकारची 1 हजार 315 वाहने आहेत. त्यांच्या इंधनावर व देखभाल करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. या ताफ्यामध्ये केवळ 7 ते 8 सीएनजीवर धावणाऱ्या गाड्या आहेत. महावितरणनेने ई-व्हेइकलसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. एकीकडे महापालिकेकडून प्रदूषण कमी करा, असे आवाहन केले जात असताना दुसरीकडे पालिकेच्या हजारो गाड्या रोज हवेमध्ये कार्बन सोडत आहेत, असा विरोधाभास आहे. 

महापालिकेकडून यंदाही नव्या डिझेल कार घेण्याचा प्रस्ताव आहे; पण त्याच सोबत "ई व्हेइकल' भाड्याने घेतल्या जाणार आहेत. ई व्हेइकलचे तंत्रज्ञान नवे असल्याने त्यात अद्याप बरेच बदल होणे अपेक्षित आहेत. त्यामुळे पालिका तूर्तास गाड्या घेण्याचा विचार नाही. अंदाजपत्रकात दैनंदिन वापरासाठी कार भाड्याने घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद आहे. यातून 50 ई-कार भाड्याने घेण्याचा प्रस्ताव प्रशासन तयार करत आहे. 

''महापालिकेच्या कामासाठी शहरात फिरण्यासाठी 'ई व्हेईकल' भाड्याने घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यासाठी निवीदी प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिकेचा नवीन 'ई व्हेईकल' विकत घेण्याचा अद्याप विचार नाही.''
- नितीन उदास, उपायुक्त, पुणे महापालिका 

नवीन 11 स्विफ्ट डिझायरचा प्रस्ताव 
महापालिकेच्या ताफ्यामध्ये नवीन 11 स्विफ्ट डिझायर कार दाखल होणार आहेत. या गाड्या घेण्यासाठी 70 लाख रुपयांची तरतूद केली आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. 

पालिकेच्या ताफ्यातील गाड्या 
घनकचरा 652 
जीप/कार 211 
अग्नीशामक 91 
इतर गाड्या 280 
जेसीबी 35 
रुग्णवाहिका 42 
ट्रॅक्‍टर 4 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com