Pune : नवले पुलालगत सेवा रस्त्यावर धडक अतिक्रमण कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Navale bridge service road encroachment

Pune : नवले पुलालगत सेवा रस्त्यावर धडक अतिक्रमण कारवाई

धायरी : नवले पूल येथील अपघाताची मालिका लक्षात घेता सर्व्हिस रोड वरील अतिक्रमणे आज सकाळपासून युध्द पातळीवर उखडून टाकण्यात आली. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडचणी येत होत्या. आता काही प्रमाणात अपघातांना पायबंद लागू शकेल अधिक प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अपघाताच्या घटना देखील होत होत्या. ही बाब सोमवारी  समोर आली. त्यामुळे सर्व्हिस रोड वरील अतिक्रमणे हलविण्याचे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी निश्चित केले होते.

आज सकाळपासून सुरु झालेल्या धडक कारवाईत नवले पूल ते मुठा नदीपर्यंत कच्ची, पक्की बांधकामे पाडून टाकण्यात आली. १०पोलीस अधिकारी,१६० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन करण्यात आले.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे  १० अधिकारी, ५ अभियंते, ४० कर्मचारी हायवे पेट्रोलिंगचे २० कर्मचारी तसेच ७ डंपर, १ पोकलेन, ३ जेसीबी, २ क्रेन १ अॅम्ब्युलन्स यांचा निर्मूलन यंत्रणेत समावेश होता.

कारवाई मध्ये ७०ते८०टपऱ्या,२० ते२५हॉटेल समोरील अतिक्रमण काढण्यात आली.१२५पेक्षा जास्त आणि कच्ची बांधकामे पाडण्यात आली आहे. संध्याकाळ पर्यंत नवले पुला पर्यत कारवाई करण्यात आली. राहिलेली कारवाई उद्या करण्यात येणार आहे.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. रविवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास बाह्य वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकच्या धडकेने तब्बल २४ वाहनांचे नुकसान झाले. तर या अपघातात १३ जण जखमी झाले असून या सर्व जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर, खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर,पुणे महापालिकेचे अतिरिक्त कुणाल खेमणार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक आणि राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी संजय कदम, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय कुमार मगर यांच्यासह अधिकारी वर्गानेही घटनास्थळी भेट देऊन चर्चा केली. त्याचवेळी अतिक्रमणे हटवण्याचे निश्चित करण्यात आले होते.

वेगवेगळ्या प्रकारची दुकाने, हाॅटेल्स आदी व्यवहार अनधिकृत टपऱ्या व स्टाॅलमधून सुरू होते. गेल्या काही वर्षांमध्ये या अतिक्रमणांकडे डोळेझाक केली जात होती. या अतिक्रमणांमुळेही अपघात होतात ही बाब तज्ज्ञांच्या निदर्शनास आली. त्यानंतर कारवाईचा विचार पुढे आला.

जिल्हा अधिकारी कार्यलयात सर्व विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत ताबडतोब सेवारस्त्यावरील अतिक्रमणे त्वरीत काढून टाकण्याचे निश्चिंत करण्यात आले.त्यांच्या आदेशाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने कार्येवाहीची मोहीम राबविण्यात येत आहे .सेवा रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई करून नऊ मीटर रस्ता ताब्यात घेऊन,रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे.

- अनिकेत यादव, साह्ययक प्रकल्प अधिकारी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.