दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

पुणे - कालव्याच्या कोसळलेल्या सीमाभिंतीची २४ तासांत दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. 

जलसंपदा विभागाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे म्हणाले, ‘‘जनता वसाहतीलगत कालव्याचा १० मीटरपेक्षा कमी रुंदीचा मातीचा भराव वाहून गेला आहे. साधारणतः पाच मीटर उंचीचा मातीचा भराव पोकलेनच्या साहाय्याने केला जात आहे. येत्या २४ तासांमध्ये दुरुस्तीचे काम केले जाईल. त्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख रुपये खर्च जलसंपदा विभागाकडून केला जाणार आहे. आतापर्यंत साधारण २५ लाख घनफूट पाणी वाहून गेले आहे. सध्या दक्षतेसाठी खडकवासला धरणातील दोन ते तीन दरवाजे बंद ठेवण्यात आले आहेत,’’ असेही मुंडे यांनी सांगितले. 

कालव्याला धोका का निर्माण झाला?
बेकायदा झोपडपट्ट्या, अवैध वाहतूक
कालव्याच्या कडेला जलवाहिन्या आणि विद्युतवाहिन्या 
उंदीर, घुशी, घोरपडींकडून मातीमध्ये छिद्रे
कालव्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मुळांमुळे भेगा
अतिक्रमित घरे, प्रार्थनास्थळे, पुतळ्यांमुळे धोका
संरक्षक भिंती, कठड्यांअभावी जलप्रदूषण
अतिक्रमणे हटविण्याकडे पुणे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

जलसंपदा विभागाकडून  केल्या जाणाऱ्या उपाययोजना  
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण कालव्याचे सर्वेक्षण
नकाशानुसार अतिक्रमणांच्या जागा निश्‍चित
पुणे महापालिकेला कालव्याच्या दुतर्फा अतिक्रमणांसंदर्भात पत्रे
पोलिस प्रशासनाकडून अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी बंदोबस्तासाठी पत्रे
अतिक्रमणविरोधी कारवाई करूनही  पुन्हा अतिक्रमणे
नेमक्‍या कोणत्या अडचणी 
कालव्याच्या दुतर्फा शंभर मीटरमधील अतिक्रमणे हटविणे
कालव्याला लागून असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या
अवैध प्रार्थनास्थळे व पुतळे हटविण्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न
महापालिका व पोलिस प्रशासनाकडून कारवाईमध्ये दिरंगाई

जलसंपदा विभागाकडून पुणे महापालिकेला कालव्याच्या दुतर्फा होत असलेली अतिक्रमणे, अवैध वाहतूक, प्रार्थनास्थळे हटविण्यासंदर्भात लेखी पत्र देऊन सूचित केले आहे. जलसंपदा विभाग, पुणे महापालिका व पोलिस प्रशासनाकडून हडपसर येथे अतिक्रमणांमध्ये १२०० झोपड्या काढण्यात आल्या होत्या; परंतु पुन्हा त्याठिकाणी अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे पुन्हा अतिक्रमणे काढण्याची कारवाई करणे गरजेचे आहे.
- संजीव चोपडे,  कार्यकारी अभियंता, पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com