नाना पाटेकर यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर

गदिमा प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा `गदिमा पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते विश्वनाथ ऊर्फ नाना पाटेकर यांना जाहीर झाला आहे.
गदिमा पुरस्कार
गदिमा पुरस्कारSakal

पुणे : गदिमा प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा `गदिमा पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते विश्वनाथ ऊर्फ नाना पाटेकर यांना जाहीर झाला आहे. तसेच ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार' अभिनेत्री निवेदिता जोशी -सराफ यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार १४ डिसेंबर रोजी गदिमा स्मृती समारोहात प्रदान करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी विश्वस्त शिवराम कोल्हटकर आणि प्रा. प्रकाश भोंडे उपस्थित होते. माडगूळकर म्हणाले की, ‘‘एकवीस हजार रुपये, सन्मान पत्र आणि सन्मानचिन्ह असे गदिमा पुस्काराचे स्वरूप आहे. तसेच गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार स्वर्गीय विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा असून अकरा हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे‘‘.

गदिमा पुरस्कार
अनिल देशमुख प्रकरण : सिताराम कुंटेंची इडीकडून चौकशी

या दोन पुरस्कारांसह यंदाचा चैत्रबन पुरस्कार संगीतकार कौशल इनामदार, विद्या प्रज्ञा पुरस्कार गायिका रश्मी मोघे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच शालान्त परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुणप्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही गदिमा पारितोषिक देण्यात येणार आहे. यंदा तब्बल १३ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले आहेत.

त्यांची प्रमाणपत्रे घरपोच पाठविण्यात येणार आहेत. १४ डिसेंबर रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता स्मृती समारोह पार पडणार आहे. समारोहाच्या अध्यक्षस्थानी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे असणार आहेत. तर सूत्रसंचालन प्रा. अरुण नूलकर करणार आहेत. असे माडगूळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com